Home Decoration Ideas in Marathi: आपल्या घरात आपल्याला सजावट करायला खूप आवडते. आपण सजावट करतो आणि अनेक नव्या - जून्या वस्तू घरात आणत असतो. त्यानंतर आपलं समाधान झालं की आपण त्या वस्तू फेकून तरी देतो तर नाहीतर त्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट तरी लावतो. परंतु आपण याच टाकाऊ वस्तूंचा वापर योग्य पुन्हा नव्या आणि सुंदर वस्तू बनवू शकता. हे तुम्हाला माहिती असेलच की आपण नानाविध कल्पना वापरून टाकाऊ टिकाऊ वस्तू तयार करू शकतो. अशाच एका महिलेनं हे काम करून दाखवलं आहे. (woman from ghaziabad makes home decor in new style from the old furniture)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान-मोठ्या घरांची सजावट इतकी उत्तम असते की अनेक जण बघतच राहतात, असे चित्र शहरांमध्ये पाहायला मिळते. काही लोक बाल्कनी आणि गच्चीवर छोटेसे बगीचेही करतात. वर म्हटल्याप्रमाणे या महिलेने घरात पडलेल्या रद्दीच्या वस्तू गोळा केल्या आणि त्यांचा अशा प्रकारे वापर केला, की त्या वस्तू पाहताच तुम्हाला आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसल्याशिवाय राहणरा नाही. या महिलेने 26 वर्षीय जुन्या स्कूटरला नवा लूक कसा दिला? हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेलच. 


वास्तविक ही महिला उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुची गोयल असे या महिलेचे नाव आहे. या बाईला साफसफाईची आणि सजावटीची खूप आवड आहे. तिच्या घरात आधीच बरीच छोटी झाडं लावलेली होती पण ती सगळी खराब झालेली होती, तेव्हा त्या बाईनं ठरवलं की आता या सगळ्या गोष्टी सजवायच्याच. 



महिलेने सासरच्यांकडे त्याची जुनी स्कूटर मागितली आणि तिने तिच्या घरातील भंगार खोलीतून अनेक वस्तू बाहेर काढल्या आणि रंगवायला सुरुवात केली. हळुहळू तिनं या सगळ्या वस्तू रंगून त्यांना बागेच्या रूपात सजवायला सुरुवात केली. लहान झाडांमध्ये स्कूटर, जुना पंखा, बेसिन आणि जुनी शिडी यांसारख्या सर्वच गोष्टींचं तिनं रिनोव्हशन केलं. 


वनस्पतींच्या 500 पेक्षा जास्त जाती
काही दिवसात त्यांची बाग खूप सुंदर दिसू लागली. सध्या महिलांच्या बागेत एक हजाराहून अधिक कुंड्या असून पाचशेहून अधिक प्रकारची झाडे आहेत. याशिवाय घरातील सर्व रद्दी इथेच बागेत असते पण ती इतकी सुंदर सजवली जातात की तीही सुंदर दिसतात. महिलेच्या बागेतील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.