Woman 2 Daughters Died In Vande Bharat Accident: उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे वंदे भारत ट्रेनने धडक दिल्याने 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी अपघातामध्ये पतीसमोरच त्याची पत्नी आणि दोन्ही मुलींना वंदे भारत एक्सप्रेसने धडक दिली. या तिघींचाही या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. बेकायदेशीरपणे बंद असलेल्या रेल्वे फाटकावरुन एका सायकलवजा रिक्षातून रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असलेल्या या कुटुंबातील 3 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा भीषण अपघात कंकरखेडा पोलीस स्टेशनच्या कासमपुर येथील रेल्वे फलाटावर हा अपघात झाला. दिल्लीवरुन सहारनपूरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस या मार्गावरुन जात होती. त्याचवेळी नरेश कुमार नावाची व्यक्ती एका सायकलवजा रिक्षातून पत्नी आणि 2 मुलींबरोबर बेकायदेशीरपणे या बंद फाटकावरुन रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र अचानक वेगाने आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसने या रिक्षाच्या मागील बाजूस धडक दिली. यामध्ये मरण पावलेल्या महिलेचं नाव मोना असून ती 45 वर्षांची होती. तर मोनाच्या मुली चारु ही 7 वर्षांची आणि इशिका ही 14 वर्षांची होती. हा अपघात झाल्याचं समजताच स्थानिकांनी रेल्वे मार्गाकडे धाव घेतली. पोलीस आणि जीआरपी घटनास्थळी दाखल झाले. लोकांच्या मदतीने मृतदेह रुळावरुन बाजूला करण्यात आले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.


पोलीस अधीक्षक पोहोचले घटनास्थळी


शहर पोलीस अधीक्षक पीयूष सिंह यांनी घटनास्थळाची पहाणी केली. त्यांनी स्थानिकांना रेल्वे रुळावरुन बाजूला होण्याचं आवाहन करत गाड्यांना मार्ग मोकळा करुन दिला. यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि तपास सुरु केला आहे. पीयूष सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक माहिला आणि तिच्या दोन्ही मुलींचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. वंदे भारत ट्रेनला हिरवा सिग्नल मिळाला होता. रेल्वेचं फाटक बंद होतं. मात्र या तिन्ही बंद फाटकांच्या खालून हे चौधे रेल्वेचे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. या तिघी रेल्वे रुळावर असताना अत्यंत वेगाने आलेल्या वंदे भारत ट्रेनने या तिघींना धडक दिली आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणातील पुढील तपास सुरु आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.


आंध्र प्रदेशमध्येही मोठा रेल्वे अपघात


दरम्यान, दुसरीकडे रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यामध्ये दोन प्रवासी ट्रेन्सची धडक झाली. या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 29 जण या अपघातात जखमी झाले आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम्-रायगड पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विशाखापट्टणम्-पलासा पॅसेंजर एक्सप्रेसला मागून धडक दिली. या अपघातामध्ये रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरुन उतरले. ही धडक कंटाकापल्ले आणि अलमांडा रेल्वे स्टेशनदरम्यान हा अपघात झाला.