Viral Video : महिला IAS अधिकारीनं साडी नेसून केला `नगाडा संग ढोल` गाण्यावर डान्स
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेहमीच हे व्हिडीओ हसवणारे किंवा मग प्राण्यांचे असतील असं नाही. कधी कधी काही व्हिडीओ तर आपल्याला खूप काही शिकवून जातात. सोशल मीडियावर (Social Media) तुम्ही आयएएस अधिकाऱ्यांचे अनेक व्हिडिओ (Viral Video) पाहिले असतील. पण तुम्ही कधी महिला आयएएस (IAS)अधिकाऱ्याला नाचताना पाहिले आहे का? व्हिडिओमध्ये दिसणारी (Woman IAS Officer) महिला अधिकारी दिव्या एस अय्यर या केरळच्या (Keral) पठानमथिट्टा जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकारी आहेत. भारतात अनेकांना नृत्याची खूप आवड आहे. त्यातले काही असे आहेत की ते सूर ऐकून स्वतःला थांबवू शकत नाहीत आणि त्यांचे पाय थरथरू लागतात. अशा लोकांमध्ये या अधिकाऱ्यांचाही समावेश असावा, म्हणूनच या महिला अधिकाऱ्याने असा अप्रतिम डान्स केला. सर्वप्रथम, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्हीही पाहावा. (Trending Video)
या व्हिडिओमध्ये (Ram Leela)'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटातील 'नगाडं संग ढोल' हे प्रसिद्ध गाणे सुरु आहे. दिव्या एस अय्यर यांनी या गाण्यावर डान्स करून लोकांना तिचे चाहते बनवले आहे. महात्मा गांधी विद्यापीठाच्या कला महोत्सवाची पाहणी करण्यासाठी दिव्या स्टेडियममध्ये पोहोचली होती आणि विद्यार्थ्यांचा सराव करताना पाहून त्या नाचू लागल्या.
हा व्हिडिओ फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेक लोक डीएमचे कौतुक करताना थकत नाहीत. बरेच लोक यावर कमेंट करत दिव्या एस अय्यर यांची स्तुती करत आहेत.