मुंबई : आजकाल इंटरनेटवर तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ बनवण्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. तुम्ही कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी किंवा ब्रेड पकोडा अशा वेगवेगळ्याप्रकारची भजी, पकोडे खाल्ली असतील. मात्र डेअरी मिल्क कॅडबरीची भजी हा प्रकार कधी खाल्ला किंवा ऐकलाय का? तुम्हालाही ऐकून धक्का बसला ना. होय, डेअरी मिल्क पकोड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडिओत एक महिला चक्क डेअरी मिल्क कॅडबरी घेऊन त्याचा पकोडा बनवताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये या महिलेनं डेअरी मिल्क कॅडबरीचं अस्तित्वच बदलून टाकलंय. रस्त्याच्याकडेला या महिलेनं आपलं डेअरी मिल्क पकोड्याचं दुकान थाटलंय. हा भजीचा नवा प्रकार पाहून तुमचे डोळे नक्कीच चक्रावतील. हा डेअरी मिल्क पकोडा खाण्यापूर्वी शंभर वेळा तरी विचार करतील. मात्र इथं वेगळंच चित्र पाहायला मिळालं. हा डेअरी मिल्क पकोडा तिथले लोक आनंदाने खाताना दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by RJ Rohan (@radiokarohan)


ही महिला काहीतरी नवीन पदार्थ बनवण्याचा विचारात होती. आणि तिला एक भन्नाट आयडिया सुचली ती अशी. रस्त्यावर एक छोटासा गाडा टाकून तिने डेअरी मिल्क पकोडा तयार करण्यास सुरूवात केली. सर्वात आधी ती डेअरी मिल्क कॅडबरी घेते. त्यानंतर बेसनाच्या मिश्रणात मिक्स करून ती कॅडबरी तेलात तळून घेते. पकोडा तळून झाल्यानंतर त्यावर चाट मसाला टाकते. आणि त्यानंतर ती हिरव्या चटणीसोबत गरमागरम डेअरी मिल्क पकोडा सर्व्ह करते. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे बसलेली दोन मुलं मोठ्या थाटामाटात ते भजी खाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ आरजे रोहनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.