नवी दिल्ली  : पतीवर अनैसर्गिक सेक्स करण्याचा दबाव टाकल्याचा आरोप करत पत्नी सुप्रीम कोर्टात पोहोचल्याची घटना समोर आलीयं. लग्नाच्या चार वर्षात पतीने ओरल सेक्स करण्यास जबरदस्ती केल्याचे याचिकेत म्हटलंय. न्यायमूर्ती एन.वी. रमना आणि न्यायमूर्ती एम.एम. शांतनगौदारने महिलेच्या पतीला नोटीस जारी करत  सुनावणी दरम्यान उत्तर देण्यास सांगितलंय.  तिच्या परवागनीशिवाय पती-पत्नीच्या शारिरीक संबंधाचे चित्रिकरण केल्याचा आरोप तिने केलायं.


इच्छेविरूद्ध व्हिडिओ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओरल सेक्स करण्यास जबरदस्ती करणं हे अनैसर्गिक मानत भारतीय दंड संहिता कलम ३७७ नुसार गुन्हा मानला जातो. याचिकेनुसार महिलेचे गुजरातमधील साबरकांठामध्ये २०१४ साली डॉक्टरशी लग्न झालं होतं. पतीने अनैसर्गिक सेक्स करण्यास वेळोवेळी जबरदस्ती केली असून तो समजविण्याच्या पलीकडे गेल्याचे तिचे म्हणणे आहे. तिच्या इच्छेविरूद्ध व्हिडिओ बनविण्यासही दबाव टाकण्यात आला. यासाठी तिला नेहमी धमकी दिली जायची.


आदेश राखून


महिलेने पती विरूद्ध साबरकांठा येथे वाईट कृत्य आणि अनैसर्गिक सेक्स केल्याची तक्रार दाखल केलीयं.  यानंतर पती गुजरात उच्च न्यायालयाच पोहोचला. कलम ३७५ नुसार या आरोपाला आधार नसून वैवाहीक दुष्कर्माचे कोणते प्रावधान नसल्याची भूमिका त्याने मांडली. उच्च न्यायालयाने कलम ३७७ नुसार आरोप फेटाळल्यानंतर महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मंगळवारी पाच न्यायाधिषांच्या पीठाने याचिकेवरील आदेश राखून ठेवलाय.