मुंबई : लक्ष्मी जोशी जेव्हा पहिल्यांदा विमानात बसली तेव्हा ती फक्त आठ वर्षांची होती. तेव्हापासून तिने ठरवले की तिला पायलट व्हायचे आहे. मोठी झाल्यानंतर तिने हे स्वप्न सत्यात उतरवण्याचे ठरवले आणि त्यासाठी तिने कठोर परिश्रम देखील केले. ज्यानंतर तिचं हे स्वप्न सत्यात उतरलं आणि तिने विमान उडवलंच. यानंतर तिच्या स्वप्नांना पंख मिळाले आणि ती कधीही थांबली आहे. लक्ष्मी जोशी अशी पायलट आहे, जीचा वंदे भारत मिशनसाठी सहभाग आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसमुळे प्रवास निर्बंधांमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मे 2020 मध्ये एक मिशन सुरू केले, त्याचे नाव होते वंदे भारत मिशन. यामध्ये स्वयंसेवा करणाऱ्या अनेक वैमानिकांपैकी लक्ष्मी जोशी हिचाही समावेश होता.


तिने अलीकडेच ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी तिचा अनुभव सांगितला, तिचे बालपणीचे स्वप्न, पायलट होण्यासाठी तिने घेतलेले प्रशिक्षण आणि परदेशात अडकलेल्या भारतीयांना कशी मदत केली याबद्दल तिने सांगितले आहे. महामारीच्या काळात एका महिन्यात तीन उड्डाण घेतली.


मुलाखतीदरम्यान जोशीने खुलासा केला की तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या वडिलांनी कर्ज घेतले होते.


ह्युमन्स ऑफ बॉम्बेला लक्ष्मीने सांगितले की, तिचे वडील तिच्यासाठी सर्वात मोठे चीअरलीडर्सपैकी एक राहिले. जेव्हा नातेवाईक तिला उलट-सुलट प्रश्न विचारायचे तेव्हा तिचे वडिल नेहमीच तिच्या बाजूने बोलायचे.


लक्ष्मीला तिचे काम फार आवडते. परंतु तिला त्या व्यतिक्त ही काहीतरी करायचे होते. त्यामुळे जेव्हा साथीचा रोग आला तेव्हा ती स्वत:हून 'वंदे भारत मिशन'मध्ये सहभागी झाली आणि लोकांना मायदेशी आणण्यासाठी तिने काम केलं.



लक्ष्मीने सांगितले की, तिचे पालक यामुळे चिंतेत होते, पण तिने तिच्या घरच्यांना परिस्थितीची जाणीव करुन दिली आणि हे मिशन किती महत्त्वाचे आहे हे समजावून सांगितले.


बचाव कार्याचा एक भाग म्हणून लक्ष्मीचे पहिले उड्डाण चीनमधील शांघाय येथे होते. ती फ्लाइट ती कधीच विसरणार नाही, असे म्हणत तिने हे सांगितले. "चीन हे सर्वाधीक कोविड रुग्ण असलेल्या हॉटस्पॉट असल्याने प्रत्येकजण चिंतेत होते." ती म्हणाली, "तिथे अडकलेल्या सर्व भारतीयांना परत आणणे हे आमचे उद्दिष्ट होते. आम्ही सर्वांनी फ्लाइट दरम्यान हॅझमॅट सूट परिधान केले होते, मी देखील ते परिधान केले होते."


शेवटी जेव्हा आम्ही त्यांना घेऊन भारतात पोहोचले तेव्हा सर्व प्रवाशांनी उभे राहून जल्लोष केला.



त्यानंतर लक्ष्मी जोशी यांनी एका महिन्यात तीन बचाव उड्डाणे केली. उड्डाणे लांब होती आणि हॅझमॅट सूट घालणे अवघड होते, परंतु अडकलेल्या भारतीयांच्या कल्पनेने तिला पुढे नेले. ती म्हणाली, "एकदा, मी वैद्यकीय मदत आणण्यासाठी भारतातही उड्डाण केलं होते. ते सर्वात विचित्र उड्डाण होते - प्रवाशांऐवजी, आम्ही शेकडो कार्टन बॉक्ससह प्रवास केला."


आता महामारीचे तिसरे वर्ष आहे, ती म्हणते, पण वंदे भारत मिशन अजूनही खूप सक्रिय आहे. अडकलेल्या भारतीयांना घरी आणण्यासाठी लक्ष्मी जोशी लवकरच नेवार्कला रवाना होणार आहे.