Woman Attack Husband With Help Of Relatives: उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने तिच्या नवऱ्याला बेदम मारहाण करुन नातेवाईकांच्या मदतीने गच्चीवरुन ढकलून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. घरात निवांत झोपलेल्या नवऱ्याच्या अंगावर उकळतं पाणी ओतल्यानंतर या महिलेने नातेवाईकांच्या मदतीने त्याला बेदम माराहण केली. त्यानंतर मारत मारत त्याला गच्चीवर घेऊन गेल्यानंतर तिथून खाली धक्का दिल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.


सासरवाडीमध्ये झाला हल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना धोरियामध्ये घडील आहे. गोरखपूरपासून 50 किलोमीटरवर असलेल्या धोरियामध्ये हा प्रकार 13 एप्रिल रोजी रात्री उशीरा घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पीडित पुरुष त्याच्या सासरवाडीला गेला होता तेव्हा हा प्रकार घडला. रात्री निवांत झोपलेल्या या व्यक्तीवर आधी त्याच्या पत्नीनं उकळतं पाणी टाकलं. काय झालं हे समजण्याआधीच या व्यक्तीला पत्नीच्या नातेवाईकांनी म्हणजेच सासरच्या मंडळींनी मारहाण करण्यास सुरुवात केली.


मोबाईल आणि चावी ताब्यात घेतली


या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव अम्रिता राय असं आहे. पती आशिष रायचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय पत्नी अम्रिता होता. यामधूनच तिने हा हल्ला केल्याचं आशिषने म्हटलं आहे. बलियामध्ये राहणारा आशिष सासरवाडीमध्ये गेल्यानंतर सासरच्या व्यक्तींनी त्याचा मोबाईल फोन आणि बाईकची चावी ताब्यात घेतली. अनेकदा विनंती करुनही आशिषला त्याच्या बाईकीच चावी देण्यात आली नाही. त्यामुळे आशिष सासरवाडीमध्येच राहण्यास तयार झाला. थोडी बाचाबाची झाल्यानंतर आशिषसहीत सर्वचजण झोपायला गेले. 


रात्री 3 वाजता अचानक...


मात्र अचानक पहाटे 3 वाजता आशिषच्या पत्नीने बाथरुमला जायचं आहे असं सांगून तो झोपलेल्या रुममध्ये प्रवेश केला. मात्र त्यावेळेस अम्रिताच्या हातात उकळत्या पाण्याचा टोप होता. हा टोप तिला तिच्या बहिणीने दिला होता असा दावा आशिषने केला आहे. अम्रिताने हे उकळलेलं पाणी आशिषच्या अंगावर ओतलं. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आशिष मोठ्याने किंचाळला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता अम्रिताच्या नातेवाईकांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्याला मारत मारत गच्चीवरुन नेऊन तिथून खाली धक्का देण्यात आला.


महिलेला पोलिसांकडून अटक


या प्रकरणामध्ये अम्रिता आणि तिच्या नातेवाईकांविरुद्ध एफआयआर दाखल करुन अम्रिताला अटक करण्यात आली आहे. आशिषला उपचारांसाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.