नवी दिल्ली : लोकल ट्रेनप्रमाणेच प्रवासी आता मेट्रोमध्ये देखील सीटवरून भांडताना आपण पाहिले आहेत. या वादांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात आणि मग लक्षात येतं की मेट्रोची अवस्था फार काही वेगळी राहिलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रोमध्ये बसण्याच्या सीटवरून एका महिलेचा तरूणाशी वाद झाला. तो वाद एवढ्या विकोपाला गेला की त्यातून कोणताच मार्ग निघत नव्हता. त्यावेळी त्या महिलेने अगदी रामबाण उपाय काढला आणि त्या मुलाच्या मांडीवरच जाऊन बसली. हा हैराण करणारा संपूर्ण प्रकार चीनमध्ये घडल्याचं समोर आला आहे. हा सगळा प्रकार व्हिडिओत कैद झाला आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये नानजिंग शहरातील मेट्रो ट्रेनमध्ये हा प्रकार घडला आहे. एक व्यक्ती आपली सीट महिलेला बसायला द्यायला विरोध करत होता. यावर बराच वेळ वाद देखील झाला मात्र त्यावर कोणताच तोडगा निघाला नाही. अनेकदा त्या महिलेने त्या मुलाला ही 'महिला सीट' असल्याचं देखील दाखवून दिलं. मात्र त्याच्याकडून कोणताच रिस्पॉन्स मिळाला नाही. अशावेळी शेवटी कंटाळून ती त्या मुलाच्या मांडीवरच जाऊन बसली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे सहप्रवासी देखील गोंधळले. 



ती महिला त्या मुलाच्या मांडीवर बसल्यामुळे सगळेच गोंधळले. सुरूवातीला तो मुलगा देखील थोडा गोंधळला. हा सगळा प्रकार एका सहप्रवाशाने कॅमेऱ्याक कैद केला आणि मग तो सगळीकडे व्हायरल झाला.