Woman Sitting On Bike Harassed By Men In Rainwater: पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने उत्तर प्रदेशसहीत अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. नवी दिल्लीसहीत उत्तरेकडील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं असताना अशा गंभीर परिस्थितीमध्येही मदत करायचा सोडून पावसात अडकलेल्या महिलेची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


शहरभर पाणीच पाणी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका दुचाकीवर चालकाच्या मागे बसलेल्या महिलेची अनोळखी लोकांकडून छेड काढली जात असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरामध्ये बुधवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरातील बराचसा परिसर पूराच्या पाण्याने जलमय झाला. येथील ताज हॉटेलसमोरच्या पूलाखालीही गुडघाभर पाणी साचलं. फार क्वचित पाणी साचल्याचा प्रकार घडत असलेल्या शहरामध्ये या पावसात भिजण्यासाठी अनेकजण बाहेर पडले होते.


महिलेला खेचलं...


अशाचप्रकारे मोटरसायकलवरुन जाणाऱ्या एका महिला आणि पुरुषाची काही टवाळ तरुणांनी छेड काढली. हे तरुण पाण्यात भिजत असताना समोरुन जाणाऱ्या या दुचाकीवरील महिलेला पाहून तरुणांनी तिच्यावर पाणी उडवण्यास सुरुवात केली. तरीही ही बाईक पुढे जात असल्याचं पाहून काही लोकांना बाईक मागून खेचण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाईकस्वार थांबला. त्याने थांबून बाईकची चावी काढली. मात्र बाईक खेचत असल्याने त्याचं संतुलन बिघडलं आणि तो एका बाजूला कलंडला. इतक्यात कोणीतरी मागे बसलेल्या महिलेला खेचून पाण्यात पाडलं. या महिलेची अधिक छेडछाड होण्याआधी तो पुरुष बाईक सोडून तरुणांच्या छेडछाडीविरुद्ध उभा राहिला आणि हे तरुण पळून गेले. नंतर व्हिडीओच्या शेवटी या पुरुषानेच त्या महिलेला पाण्यातून उठून उभं राहण्यास मदत केली.


पोलिसांसमोरच घडला हा प्रकार


दरम्यान, या हा सारा प्रकार घडत असताना पोलीस तिथेच उभे असल्याचं सांगितलं जात आहे. आधी पोलिसांना ही सारी मस्करी वाटली. मात्र ती महिला पडल्यानंतर पोलीस मदतीसाठी पुढे सरसावले. हे तरुण पळून गेले असले तरी पोलीस आता या टवाळखोरांचा शोध घेत आहेत. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ, नेमकं घडलं काय...



घडलेला हा सारा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारे पोलिसांसमोरच महिलांचा छळ होत असेल तर न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न अनेकांनी उपस्थि केला आहे.