पाहा, धक्कादायक! महिला व्यवस्थित साडी नेसून हॉटेलात गेली, रिसेप्शनिस्टने तिचे असे हाल केले...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटिझन्सने जोरदार टीका केली आहे
नवी दिल्ली : नवी दिल्लीतल्या एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये घडलेला एक प्रकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. साडी नेसून आलेल्या एका महिलेला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंबंधीचा 16 सेकंदाच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओमध्ये एक पुरुष आणि एक महिला कर्मचारी या महिलेची अडवणूक करताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये महिलेने 'साडी नेसलेल्या महिलांना प्रवेश नाही असा नियम हॉटेलमध्ये कुठे लिहिला आला आहे का, असा सवाल केला. यावर महिला कर्मचाऱ्याने धक्कादायक उत्तर दिलं आहे. 'आम्ही फक्त स्मार्ट कॅज्युअल कंपड्यांमध्ये असणाऱ्यांना प्रवेश देतो. साडी हा स्मार्ट कॅज्यूअल प्रकार नाही, असं या महिला कर्मचाऱ्यांनं म्हटल्याचं या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतंय.
रेस्टॉरंट साडी प्रकरणाला नवा अँगल, त्या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य काय?
लेखिकेने शेअर केला व्हिडिओ
लेखिका शेफाली वैद्य यांनी हा व्हिडिओ शेअर करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, साडी स्मार्ट वेअर नाही हे कोणी ठरवलं? मी अमेरिका (USA), यूएई (UAE) तसंच यूके (UK) मधल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून गेली आहे. तिथे मला कोणीही रोखलं नाही आणि भारतात अकिला रेस्टॉरंट (Aquila restaurant साडी स्मार्ट वेअर नाही हे सांगत स्वत:चे वेगळे नियम बनवत आहे! हे आश्चर्यकारक आहे.
या व्हिडिओवर नेटिझन्सनेही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. विनीत चतुर्वेदी यांनी हॉटेलच्या या धोरणावर टीका करताना हा वाईट प्रकार असल्याचं म्हटलं आहे. तर कौशल नावाच्या युझर्सने या प्रकरणावर दिलेल्या कॅप्शनमध्ये कोलोनियल कुलीज (Colonial Coolies) लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी एका युझर्सने लिहिलंय, 'दुर्दैवाने रेस्टॉरंटच्या मालकांना ग्राहकांच्या प्रवेश देण्याचे अधिकार आहेत. ज्याअंतर्गत ते कोणालाही कोणतेही स्पष्टीकरण न देता प्रवेश देण्यापासून रोखू शकतात.
गेल्या वर्षी घडली होती अशीच घटना
गेल्या वर्षी मार्चे 2020 मध्ये दिल्लीतल्या वसंत कुंज भागातील Kylin and Ivy रेस्टॉरंटमध्येही असाची प्रकार घडला होता. साडी नेसलेल्या महिलेला या हॉटेलमध्ये प्रवेश देण्याता आला नव्हता. इथं पारंपारिक वेशभुषेतील ग्राहकांना प्रवेश नाही, ही आमची पॉलिसी आहे असं उत्तर हॉटेल चालकांनी दिलं होतं.