CV आणि तो ही Housewife चा! अनुभव, कामांची यादी पाहून म्हणाल, `खरोखरच सुपर वुमन!`
Linkedin jobs : आपण नोकरीच्या शोधात असलो, की त्याची सुरुवात होते ती म्हणजे CV तयार करण्यापासून, अर्थात इथं कमाचा अनुभव, शिक्षण आणि तत्सम माहिती नोकरीसाठी अर्ज केल्या जाणाऱ्या कंपनीकडे दिली जाते.
Job News : नवी नोकरी, नवी माणसं, सारंकाही नवं. अशा या नन्या वर्तुळात वावरताना पहिल्या पावलावर आपण कायमच अडखळतो. नोकरीसाठीच्या या प्रवासाची सुरुवात होते ती अर्थातच योग्य शिक्षणानं आणि CV तयार करण्यापासून. बरं, इथंही कसब पणाला लागतं. कारण, या सीव्हीवरूनच तुमचं संवाद कौशल्य, गोष्टी मांडण्याची पद्धत आणि तुमचा एकंदर स्वभाव या गोष्टी कळत असतात. त्यामुळं CV हा कायमच प्रभावी असणं अपेक्षित आहे, असाच सल्ला अनेकजण देतात.
सध्या सोशल मीडियावर हे CV प्रकरण बरंच चर्चेत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे linkedin या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेला CV. आता तुम्ही म्हणाल त्यात काय, एखादा फोटो वगैरे असेल. पण, मुळात तसं नाहीये. लिंक्डइनवर एका गृहिणीनं तिच्यासंदर्भातील माहिती, कामाचा अनुभव वगैरे वगैरे माहिती देत तिचा CV अपलोड केला आहे.
नोकरीसाठी अर्ज करताना या महिलेनं आपण 13 वर्षांचा Break घेतल्याचं नमूद केलं. पण, इथंही तिनं या 13 वर्षांच्या काळात केलेल्या कामांचा (घरातील दैनंदिन कामांचा) उल्लेखही अगदी प्रभावीपणे केला. तिच्या प्रामाणिकपणानं सर्वांचीच मनं जिंकली.
'ग्रोथिक' या कंटेंट मार्केटिंग कंपनीच्या संस्थापकपदी असणाऱ्या युगांश चोक्रा यांनी या महिलेचा सीव्ही सोशल मीडियावर शेअर केला. 'या महिलेला कामाचा तब्बल 13 वर्षांचा अनुभव आहे. गृहिणी म्हणून का असेना, पण तिचा अनुभव मात्र विचारात घेण्याजोगा आहे', अशा प्रतिक्रिया हा सीव्ही वाचून अनेकांनीच दिल्या. अनेकांनीच कितीही दुर्लक्ष केलं तरीही कुटुंबाची काळजी घेणं हेसुद्धा जबाबदारीचं आणि कठीण काम असल्याची प्रतिक्रिया काही बड्या कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या व्यक्तींनी दिल्या.
हेसुद्धा वाचा : इस्रोमधील शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो? सोयीसुविधांचीही बरसात
भारतामध्ये बहुतांश महिला पूर्ण ताकदीन नोकरीवर त्यांचं योदगान देतात ही बाब अधोरेखित करत चोक्रा यांनी मुलंबाळं असणाऱ्या महिलांवर असणारी कामाची जबाबदारी आणि कुटुंबामध्ये पुरुष आणि त्यांच्या कामात असणारी तफावत याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
महिलेनं सीव्हीमध्ये नेमकं लिहिलंय तरी काय?
Housewife असणाऱ्या आणि सध्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या या महिलेनं तिच्या CV मध्ये लिहिलं, '2009 पासून आतापर्यंत मी होममेकर आहे.' असं लिहिताना आपल्या जबाबदाऱ्यांविषयी तिनं लिहिलं, 'दैनंदिन कामं योग्य वेळेत पूर्ण करणं. गेल्या काही काळापासून जवळपास एकटीनंच घरातील सर्व जबबादाऱ्या स्वकतृत्त्वावर पार पाडणं, दोन्ही मुलांच्या जन्मापासून त्यांच्याप्रती समर्पक राहणं, त्यांना गृहपाठ, शालेय प्रकल्पात मदत करणं आणि त्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रीत करणं'.
आपल्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर आता या महिलेनं नोकरीच्या शोधासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तिच्याविषयीची ही माहिती कमालीची चर्चेत आली असून, सध्या सर्वदूर तिच्या प्रामाणिकपणाचंच कौतुक होताना दिसत आहे. ज्यामुळं ही महिलाच नव्हे, तर सर्वच गृहिणी खऱ्या अर्थानं 'सुपरवुमन' आहेत हे पुन्हा एकदा सर्वांनाच पटलं आहे.