इस्रोमधील शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो? सोयीसुविधांचीही बरसात

Isro Jobs Salary : चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणासह असंख्य भारतीयांच्या महत्त्वाकांक्षाही थेट अवकाशाच्या दिशेनं झेपावल्या. देशासाठी अतिशय ऐतिहासिक अशा या क्षणाचे साक्षीदार तुम्हीआम्ही सगळेच झालो.   

Jul 24, 2023, 09:13 AM IST

Isro Jobs Salary : काही दिवसांपूर्वीच प्रक्षेपित झालेल्या चांद्रयान 3 मुळं भारतीय अंतराळ विश्वासह जागतिक स्तरावरही देशानं एक नवा टप्पा गाठला. यानिमित्तानं या मोहिमेत योगदान देणारी चेहरेही समोर आले. 

 

1/7

भारतीयांच्या महत्त्वाकांक्षाही थेट अवकाशाच्या दिशेनं

chandrayaan 3 ISRO Salary how much scientists get paid

Isro Jobs Salary : चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणासह असंख्य भारतीयांच्या महत्त्वाकांक्षाही थेट अवकाशाच्या दिशेनं झेपावल्या. देशासाठी अतिशय ऐतिहासिक अशा या क्षणाचे साक्षीदार तुम्हीआम्ही सगळेच झालो

2/7

मोहिमेसाठी मोलाचं योदगान देणारे अनेक चेहरे

chandrayaan 3 ISRO Salary how much scientists get paid

चांद्रयान 3 मोहिमेच्या निमित्तानं या मोहिमेसाठी मोलाचं योदगान देणारे अनेक चेहरे समोर आले. ज्यामध्ये शास्त्रज्ञांनी आपल्या संपूर्ण टीमचं तोंड भरून कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. याच कारणामुळं आणखी एक चर्चा रंगली ती म्हणजे या शास्त्रज्ञांच्या नोकऱ्यांची आणि इस्रोतून त्यांना मिळणाऱ्या पगाराची.   

3/7

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)

chandrayaan 3 ISRO Salary how much scientists get paid

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) वतीनं जेव्हा अध्यक्ष आणि चांद्रयान 3 मोहिमेचं नेतृत्त्वं करणाऱ्या शास्त्रज्ञांनी माध्यमांना संबोधित केलं त्यावेळी या मंडळींची कर्तगारी अनेकांचेच डोळे दीपवून गेली. काहींना तर प्रश्नच पडला, इतक्या कोट्यवधींच्या मोहिमांचं नेतृत्त्वं करणाऱ्या या मंडळींना किती पगार असेल बरं? (chandrayaan 3 ISRO Salary how much scientis get paid )  

4/7

दर महिन्याला मिळणारं वेतन...

chandrayaan 3 ISRO Salary how much scientists get paid

उपलब्ध माहितीनुसार इस्रोमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणीच्या लेव्हल 10 मध्ये Scientist ‘SC’ पदी सेवेत असणाऱ्यांना दर महिन्याला किमान 56,100 रुपये इतकं वेतन अपेक्षित असतं. नोकरीवर रुजू झालेल्या उमेदवारांना प्रोबेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ISRO सायंटिस्टचं पद, त्यासाठीचे भत्ते आणि इतर सुविधांचा लाभ घेता येतो.     

5/7

पगारातील भत्ते...

chandrayaan 3 ISRO Salary how much scientists get paid

इस्रोमध्ये नोकरी लागल्यास पदानुसार मिळणारा पगार आणि त्यासाठी भत्ते यांची आखणी केली जाते. जिथं सुरुवातीचं वेतन 56100 रुपये प्रतिमहिना असून, बंगळुरू येथे इच्छुकांना नोकरीसाठी जावं लागतं. भत्त्यांचं सांगावं तर, या पगारांमध्ये घर भाडं, मगाहाई भत्ता, वैद्यकिय भत्ता, वाहतूक भत्ता, विमा, प्रवास सवलती, पेन्शन योजना, हाऊस बिल्डींग अलाऊन्स या आणि अशा इतर भत्त्यांचा समावेश असतो.   

6/7

पदानुसार कामाची जबाबदारी

chandrayaan 3 ISRO Salary how much scientists get paid

इस्रोमध्ये रुजू झालेल्यांना त्यांच्या पदानुसार कामाची जबाबदारी सोपवण्यात येते. ज्याचा उल्लेख त्यांच्या Job Profile मध्ये केला जातो. इस्रोकडून राबवण्यात येणाऱ्या उपग्रह प्रक्षेपण, अवकाश निरीक्षण या आणि अशा अनेक मोहिमांमध्ये या मंडळींना योगदान देता येतं. जिथं विज्ञान शाखेतील विविध विभागांसाठीचे शास्त्रज्ञ आपलं कसब पणाला लावतात.   

7/7

प्रशिक्षण शिबिरं

chandrayaan 3 ISRO Salary how much scientists get paid

इस्रोमध्ये तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील अभ्यास पूर्ण केलेली मंडळी विविध संशोधनं, विकासकामं आणि तत्सम गोष्टींसाठी निवडली जातात. वेळोवेळी वैयक्तिक कामगिरीच्या बळावर त्यांना पदोन्नती आणि पर्यायी पगारवाढीचाही लाभ मिळतो. शिवाय वेळोवेळी इस्रोतर्फे अद्ययावर तंत्रज्ञान आणि अवकाशाशाशी संबंधित जागतिक स्तरावरील प्रशिक्षण शिबिरांमध्येही सहभागी होण्याची संधी मिळते.