Video Viral : देशभरात लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे ठिकठिकाणी ढोल-नगाडे वाजतायत. लग्नाच्या वराती (wedding ceremony) निघतायत. या वरातीत अनेक लोक भन्नाट डान्स करत असतात. या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच व्हायरल होत असतात. आता असाच एका लग्नातील डान्सचा (Wedding Dance) व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 


व्हिडिओत काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर (Social Media) सध्या लग्न सोहळ्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही व्हिडिओ हे लग्नातील रितीरीवाजातले आहेत, तर काही नवरीचे आहेत, ज्यामुळे ती खुप सुंदर दिसतेय, तर काही व्हिडिओ हे लग्नाच्या वरातीतले आहेत. ज्यामध्ये वरातीत नातेवाईक तुफान डान्स करताना दिसत आहेत. अशाच एक वरातीतला व्हिडिओ समोर आला आहे. 


एका वहिनीने जबरदस्त डान्स (Wedding Dance) केला आहे. 'तेरी आंख्या का यो काजल...' या सपना चौधरीच्या गाण्यावर तिने हा डान्स (Wedding Dance) केला आहे. हा तिचा डान्स पाहून सर्वच अवाक झाले आहेत. विशेष म्हणजे तुम्ही व्हि़डिओ पाहाल तर तिने एकटीनेच हा लग्न सोहळा गाजवल्याचे दिसत आहे. कारण य़ा व्हिडिओत ती एकटीच नाचत आहे. वहिनी तिच्या नृत्यात पूर्णपणे हरवून गेली आहे. आजूबाजूला वडीलधारी मंडळीही बसलेली पाहून ती सर्व विसरून आनंदाने नाचत आहे.


सोशल मीडियावर (Social Media) या डान्सचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. श्रद्धा टेमरे कात्रे नावाच्या युजरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. काही लोकांना महिलेचा हा डान्स आवडला आहे, तर काही लोक डान्सची खिल्ली उडवत आहेत.



दरम्यान एका यूझरने असे लिहिले की, सपना चौधरी सुद्धा असा डान्स (Wedding Dance) करू शकत नाही. दुसर्‍या यूझरने लिहिले, असे दिसते आहे की ती तिच्या कुटुंबाला विसरली आहे जे तिचा डान्स पाहत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.