Shocking News : आजकाल जीभेला चव सुटली की आपण कुठेही असो, म्हणजे ऑफिसात असो, अथवा घरी असो, ऑनलाईन फुड (Online Food) मागवून चोचले पुरवून घेतो.असेच ऑनलाईन फुडच्या माध्यमातून स्वत:च्या जीभेला चोचले पुरवणे एका 20 वर्षीय तरूणीला महागात पडले आहे. कारण ऑनलाईन मागवलेली बिर्याणी तरूणीच्या (biryani ordered online) जीवावर बेतली आहे. या घटनेने तरूणीच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे.  या घटनेत आता आरोग्य मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 


घटनाक्रम काय?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेरुंबला येथील रहिवासी असलेल्या अंजू श्रीपार्वती (20) हिने 31 डिसेंबर रोजी म्हणजेच नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला पार्टी करण्यासाठी कुझिमंथी हा बिर्याणीचा (biryani ordered online) प्रकार मागवला होता. कासारगोड येथील रोमान्सिया नावाच्या रेस्टॉरंटमधून तिने ही बिर्याणी मागवली होती. ही बिर्याणी खाऊन तिची प्रकृती ढासळली होती. त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तरीही परीस्थिती सुधारत नसल्याने तिला दुसऱ्या रूग्णालयात नेण्यात आले होते.या दरम्यान तिचा मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. 


 


हे ही वाचा : पायलट बाप-लेकीची कमाल! प्रवाशांना घडवली सुंदर हवाई सफर, VIDEO व्हायरल 


 


बिर्याणीतून विषबाधा


अंजू श्रीपार्वती या तरूणीला बिर्याणीतून (biryani ordered online) विषबाधा झाल्याचा आरोप आहे. तिने मागवलेली कुझिमंथी बिर्याणी खाल्ल्यामुळे तिला विषबाधा झाली होती, या विषबाधेतून तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान अंजूच्या या निधनाने कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. तसेच कुटूंबियांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासास सूरूवात केली आहे. तसेच शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले आहेत. 


आरोग्य मंत्र्यांचे चौकशीचे आदेश 


दरम्यान या घटनेची दखल आता राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी (Health Minister) घेतली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जॉर्ज यांनी अन्न सुरक्षा आयुक्तांना या घटनेबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यांतर्गत (FSSA) अन्नातून विषबाधा केल्याचा आरोप असलेल्या हॉटेल्सचा परवाना रद्द करण्यात येईल, असे ते म्हणाले आहेत.


दरम्यान केरळमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत आता तरूणीला न्याय मिळतो का? हे पाहावे लागणार आहे. तसेच अशीच घटना महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये देखील घडली होती.