पायलट बाप-लेकीची कमाल! प्रवाशांना घडवली सुंदर हवाई सफर, VIDEO व्हायरल

Viral Video : जसे मुलाचे त्याच्या आईसोबत घट्ट नाते असते, तसेच बाप आणि लेकीचे देखील खुप घट्ट नाते असते. बाप कितीही कठोर असला तरी मुलीसाठी त्याचा जीव नेहमीच तुटत असतो. बाप मुलीसाठी दुसरी आई असतो,असे म्हणायलाही हरकत नाही आहे. अशाच एका पायलट बाप-लेकीची (Father-Daughter Story)एक कहानी समोर आली आहे. या कहानीची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

Updated: Jan 7, 2023, 06:36 PM IST
पायलट बाप-लेकीची कमाल! प्रवाशांना घडवली सुंदर हवाई सफर, VIDEO व्हायरल  title=

Viral Video : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ हे खूप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे खुपच आश्चर्यकारक असतात.असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत पायलट बाप-लेकीची (Father-Daughter Story) कहानी सांगण्यात आली आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येणार आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

जसे मुलाचे त्याच्या आईसोबत घट्ट नाते असते, तसेच बाप आणि लेकीचे देखील खुप घट्ट नाते असते. बाप कितीही कठोर असला तरी मुलीसाठी त्याचा जीव नेहमीच तुटत असतो. बाप मुलीसाठी दुसरी आई असतो,असे म्हणायलाही हरकत नाही आहे. अशाच एका पायलट बाप-लेकीची (Father-Daughter Story)एक कहानी समोर आली आहे. या कहानीची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

 

हे ही वाचा : ऑनलाईन आर्डर केलेली बिर्याणी खाल्ली, अन् तरूणीला मृत्यूने गाठले

 

व्हिडिओत काय? 

सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत एका बाप-लेकीची कहानी सांगण्यात आली आहे. हे दोघेही पायलट असल्याचे व्हिडिओतून कळत आहे. या पायलट लेकीने तिच्या बापासाठी तयार केलेला हा व्हिडिओ आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला पायलट बाप-लेकीचे (Father-Daughter Story) फोटो आहे.या फोटोनंतर पुढे लेकीने बापाला उद्देशून काही ओळी लिहल्या आहेत.या ओळीत ती म्हणतेय, वडिलांसोबत पुन्हा प्रवास करतेय, पण यावेळेस पायलटच्या पोषाखात आहे. वडिलांसोबत पायलटच्या पोषाखात विमानाने भरारी घ्यावी हे तिचे स्वप्न होते, हे स्वप्न आता सत्यात उतरलं आहे, असे तिने म्हटलेय.

माझ्या वडिलांनी नेहमी माझ्यातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर काढल्या.माझ्यावर सर्व प्रकारे विश्वास ठेवला.याच कारणामुळे आज मी येथे आहे, याचे कारण माझे वडिल आहेत, असे पायलट तरूणीने म्हटलेय.विशेष म्हणजे पायलट तरूणीचे स्वप्न होते की, तिने आणि वडिलांनी मिळून एके दिवशी प्रवाशांना विमान सफाई करावी. आणि तिचे हे स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. त्यामुळे तिने हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saniya Chati (@saniyachati)

दरम्यान सानिया चाटी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 8 लाख व्यूस आले आहेत.या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय. हा बाप-लेकीचा (Father-Daughter Story) व्हिडिओ पाहून अनेक लोक आता भावूक होत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.