मुंबई : राजस्थानमध्ये (Rajasthan) दारूच्या दुकानाचा (Liquor Shop Aucction) लिलाव सुरू झाली. यानुसार हनुमानगड जिल्ह्यातील कुईया गावात दारूच्या दुकानासाठी लिलाव केला जात आहे. या दारूच्या दुकानाचा लिलाव हा ७२ लाखांपासून सुरू झाला आणि त्यानंतर बोली वाढतच गेली. या दारूच्या दुकानावर आपला हक्क बजावण्यासाठी एकाच कुटुंबातील दोन महिलांची (Women Fight for liquor Shop) चांगलीच जुंपली. सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा लिलाव रात्री २ वाजेपर्यंत चालली. महत्वाची बाब म्हणजे हा लिलाव तब्बल ५१० कोटी रुपयांवर थांबली. 


गेल्यावर्षी ६५ लाखात विकलं गेलं दुकान 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुईया गावात गेल्यावर्षी दारूचं दुकान ६५ लाखांना विकली गेली. यावर्षी या दारूच्या दुकानाची बोली ७२ लाखांपासून सुरू झाली. या दारूच्या दुकानावरून एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये चांगलाच वाद जुंपला. सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेली बोली रात्री २ ला संपली. अखेर ५१० करोड रुपयांवर ही बोली थांबली. एवढ्या कोटी रुपयांना बोली लागल्यानंतर अधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणात लक्ष घातलं आहे. 


लागला ५१० कोटींचा लिलाव 


किरण कंवर या महिलेने ५१० कोटी १० लाख १५ हजार ४०० रुपयांची बोली लावली. ही सर्वात मोठी बोली असून या महिलेला तीन दिवसांच्या आत रक्कम भरण्यास सांगण्यात आले आहे. ही रक्कम तीन दिवसात न भरल्यास ई-लिलावात सहभागी होण्यासाठी भरलेली रक्कम जप्त करण्यात येईल. 


प्रियंका आणि किरण अशा एकाच कुटुंबातील दोन महिला आहे. या दोघींमध्ये कायमच स्पर्धा सुरू असते. या दारू दुकानाच्या लिलावातही त्यांची स्पर्धा पाहण्यास मिळाली. मात्र किरण कंवरने लावलेली बोली सर्वात मोठी ठरली. आता किरणने तीन दिवसांत ही रक्कम न भरल्यास प्रियंकाला त्यांनी लावलेल्या बोलीवर दुकान मिळू शकेल.