मेरठ : बरेचदा ओळखीतून स्थळ पाहण्यापलीकडे ऑनलाईन साईटवरून लग्न जुळवण्याचा घाट घातला जातो. ऑनलाईन लग्न जुळवताना जुजबी माहिती पाहून लग्न ठरवलं जातं किंवा विश्वास ठेवला जातो. स्थळाची सखोल चौकशी न करणं चांगलंच महागात पडू शकतं हे माहिती असतानाही बरेचदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेसोबतही असाच प्रकार घडला आहे. ऑनलाईन साईटवरून लग्न जुळवणं चांगलंच महागात पडलं. या महिलेला आरोपीने एक दोन नाही तर तब्बल 60 लाख रुपयांचा गंडा घातला.


पीडित महिला लग्नासाठी ऑनलाईन साईटवरून विवाह जुळवत होती. एक स्थळ तिला आवडलं. तिने त्या स्थळाने दिलेल्या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवला. 


या महिलेचं 2021 पासून बोलणं सुरू झालं. आरोपी व्यक्तीनं या महिलेकडून अडचण असल्याने पैसे मागितले. महिलेनंही चांगली ओळख आणि लग्नाचा विचार करत असल्याने मदत करण्यास नकार दिला नाही. 


पण आरोपी भाच्याचं कारण सांगून सतत पैसे उकळू लागला. भाच्यासाठी कॅनडाला जायला पासपोर्ट आणि व्हिजा काढण्यासाठीही या महिलेकडून पैसे उकळले. काही ना काही कारणाने तो या महिलेकडून पैसे उकळत राहिला. 


या सगळ्या प्रकरणी अखेर वैतागून महिलेनं पोलिसात तक्रार केली. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला मेरठची आहे. तिचं पहिलं लग्न झालं होतं. तिचा नवरा सैन्य दलात होता. मात्र त्याच्या निधनानंतर तिने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


पतीच्या निधनानंतर मिळेले सगळे पैसे या महिलेनं फसवणूक करणाऱ्या माणसाला दिले. तो माणूस सगळे पैसे घेऊन फरार झाला. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.