नागौर : भारतात गेल्या काही दिवसांपासून दोन डोकी असलेले बाळ जन्माला येत असल्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत महिलेने दोन डोकी, चार हात, पाय आणि छाती जोडलेल्या बाळाला (twins baby) जन्म दिला आहे. या बाळाला पाहून कुटूंबासह डॉक्टरही (Doctors) आश्चर्यचकित झाले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुचेराजवळील बसनी गावातील रहिवासी असलेल्या जितेंद्र नायक याची गर्भवती पत्नी ललिता (23) हिला प्रसुती (women delivery) वेदना होत असल्याने तिला रूग्णालयात आणण्यात आले होते. यावेळी ललिताचं ऑपरेशन (Operation) पार पाडलं आणि यशस्वीरीत्या प्रसूती झाली. यावेळी ललिताच्या पोटातून जन्मलेल्या मुलाची दोन डोकी, चार हात आणि पाय होते, यासह या बाळाच्या दोन्ही छातीही जोडलेल्या आढळल्या. या बाळाला पाहून डॉक्टरही (Doctors) आश्चर्यचकित झाले होते. सध्या मुले निरोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. नागौरमधील मेर्टा सिटीच्या राम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधून ही घटना समोर आली होती. 


या प्रकरणावर बालरोग तज्ज्ञ डॉ.बलदेव चौधरी यांनी सांगितले की, अशा प्रसूतीला मेडिकलमध्ये थोराकोपीगस म्हणतात. अशा प्रकरणांमध्ये, 75 टक्के प्रकरणे एकाच हृदयावर परिणाम करतात. येथे सर्वात मोठी अडचण विभक्त होण्यात आहे. कधी कधी यकृत देखील एक असू शकते, असे ते म्हणाले आहेत. 


मुलाची जगण्याची शक्यता कमी
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मनीष कुमार सैनी यांनी सांगितले की, मुले जोडल्याने नॉर्मल प्रसूतीचे प्रमाण नगण्य असते. मुले छातीशी संलग्न आहेत. मुलांचे वजन 4 किलो आहे. दीड ते दोन लाखात असे एक प्रकरण समोर येते. अशा परिस्थितीत मुलांचे जगण्याची शक्यता फारच कमी असते. काही क्वचितचं मुल जगतात.जगात अशी अनेक मुले जन्माला आली आहेत, जी जगतही आहेत. 


राजस्थानच्या नागौरमध्ये अशा प्रकारचे बाळ जन्माला (twins baby) आल्याची घटना घडली आहे. या घटनेची राज्यात एकचं चर्चा आहे.