मुंबई : आताच्या जगात कुणीच कुणाच नसतं, असा अनुभव आपण प्रत्येकाकडून ऐकत असतो. असं असताना एक वेगळी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ओडिशातील कटक जिल्ह्यात औदार्याचे असे उदाहरण समोर आले की, ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले. येथे मिनाती पटनायक नावाच्या महिलेने आपली संपूर्ण मालमत्ता एका रिक्षाचालकाला दान केली. ज्या रिक्षावाल्याचं नशीब खुललं त्याचं नाव आहे बुधा. पण त्याच्या चांगुलपणाची कहाणी तुम्हालाही भावूक करेल.


या निर्णयामुळे दूर झाले नातेवाईक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देणगीदार मिनाती पटनायक आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्याचवेळी त्याचे नातेवाईक मिनातीला असे केल्याबद्दल अपशब्द बोलत आहेत. वास्तविक ६३ वर्षांची मिनाती या जगात एकटी आहे. या शहरात तिच्या तीन बहिणी आणि एक भाऊ आणि मुले आहेत. नातेवाईकांची लांबलचक यादी असूनही तिने आपल्या पतीची आयुष्यभराची कमाई एका साध्या रिक्षावाल्याकडे हस्तांतरित केली आहे.


यामुळे घेतला महत्वाचा निर्णय 


प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मिनाती पटनायक यांनी असा निर्णय घेण्याचे कारणही अतिशय न्याय्य आहे. किंबहुना, गेल्या वर्षभरात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या नावावर त्यांनी आपली तीन मजली घर आणि संपूर्ण मालमत्ता हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. या एका वर्षात त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. मिनाती यांचे पती कृष्ण कुमार कर्करोगाने त्रस्त होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांचे निधन झाले.


मिनती पटनायक यांची एकुलती एक मुलगी कमल कुमारी हिचा देखील या वर्षी जानेवारीत आगीत होरपळल्य. त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. वर्षभरात दोन भयंकर दु:ख सोसलेल्या मिनतीचा संसार मोडला, पण या काळात रिक्षाचालक बुधा आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला कधीच एकटं सोडलं नाही.  रिक्षावाल्याने काहीही झाले तरी न मागता मदत करण्यात कसर सोडली नाही. यामुळे कृतज्ञतेने हिलेने आपली संपत्ती बुधाकडे हस्तांतरित केली.



बुधा आता कायदेशीर मालक 


वास्तविक बुधा 1994 पासून मिनाती पटनायक यांच्या घरात भाड्याने राहत होते. मीनातीला ते सुरुवातीपासून 'आई' म्हणून हाक मारत आहेत. हा तोच बुढा होता जो मिनातीच्या मुलीला शाळेतून कॉलेजपर्यंत स्वतःच्या रिक्षातून घेऊन जात होता. मिनातीचा नवरा कृष्णा हा व्यवसाय करायचा आणि बुधा तिच्या कुटुंबाच्या प्रत्येक गरजेपोटी उभा राहिला.


मिनातीने सांगितले की, इतक्या दिवसात बुधा त्यांच्या कुटुंबाचा एक भाग झाला आहे. मिनाती आणि तिच्या पतीने बुधाच्या मुलीला तिच्या लग्नात आर्थिक मदत केली होती. आता मिनातीचा असा विश्वास आहे की बुधा त्यांच्या मालमत्तेचा कायदेशीर वारस बनण्यास योग्य आहे.


लोकांकडून होतंय कौतुक 


मिनातीच्या महानतेचे आणि औदार्याचे आता शेजारच्या लोकांव्यतिरिक्त सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. प्रत्यक्षात या संपूर्ण देणगीची रक्कम एक कोटीच्या वर आहे. केवळ चांगली वृत्ती आणि सेवेने प्रभावित होऊन मिनातीने तिचे तीन मजली घर आणि 300 ग्रॅम सोन्याचे दागिने दान केले. ही घटना समजल्यानंतर अनेकजण भावूकही झाले.