मुंबई : आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh)  तिरुपती (Tirupati) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वास्तविक येथे एका महिलेनं तिच्या पतीचं लग्न त्याच्या Ex- Girlfriend सोबत केलं आणि त्यांनी ठरवलं की आता ते तिघेही एकाच घरात एकत्र राहतील. महिलेनं स्वत: पतीनं Ex Girlfriend शी लग्न करण्यासाठी सर्व व्यवस्था केली. ही बातमी सोशल मीडियावर लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. या अनोख्या प्रेमकथेबद्दल जाणून घेऊन लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.


आणखी वाचा : Meat खाणाऱ्या पुरुषांविरोधात PETA चं महिलांना आवाहन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार, पतीनं Ex Girlfriend सोबत लग्न केल्याचं प्रकरण तिरुपतीमधील डक्कली येथील आंबेडकर नगरचे आहे. येथे विमला नावाच्या महिलेनं तिचा पती कल्याणचं त्याची Ex Girlfriend नित्या श्रीसोबत लग्न लावून दिलं आहे. कल्याण एक प्रसिद्ध YouTuber आहे. विमला आणि कल्याण काही वर्षांपूर्वी भेटले होते. या भेटीचे आधी मैत्रीत आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर कल्याण आणि विमला यांनी एकमेकांशी लग्न केलं.


आणखी वाचा : 'स्वच्छता मित्र' म्हणवणाऱ्या शिक्षकाचा प्रताप, विद्यार्थिनीला घाणेरडा गणवेश काढायला लावला आणि...


लग्नाच्या काही वर्षांनी विमलाला तिचा नवरा कल्याणच्या वागण्यात थोडासा बदल जाणवू लागला. प्रत्यक्षात विशाखापट्टणम येथे राहणाऱ्या नित्या श्री नावाच्या मुलीचा कल्याणच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश झाला. काही वर्षांपूर्वी कल्याण आणि नित्यश्रीचं ब्रेकअप झालं. त्यानंतरच कल्याणनं विमलासोबत लग्न केलं. पण जेव्हा नित्याश्रीला कल्याणच्या लग्नाची बातमी कळली तेव्हा ती त्याच्या घरी पोहोचली. (Women gets husband to get married his ex girlfriend in andhra pradesh tirupati )


आणखी वाचा : 'मी Gay नाही पण मला...', राम गोपाल वर्मा यांनी या लोकप्रिय अभिनेत्याला Kiss करण्याची व्यक्त केली इच्छा


रिपोर्ट्सनुसार, नित्याश्रीनं हात जोडून विमलाकडे तिचा नवरा कल्याणशी लग्न करण्याची परवानगी मागितली, कारण तिला कल्याणला गमावायचं नव्हतं. नित्याश्रीनं हा प्रस्तावही विमलासमोर ठेवला की लग्नानंतर ते तिघेही एकाच छताखाली एकत्र राहतील. मात्र, काही वेळ विचार केल्यानंतर विमलानं नित्यश्रीचा प्रस्ताव स्वीकारला आणि आपल्या पतीचं त्याच्या Ex Girlfriend सोबत लग्न लावून दिलं.