'मी Gay नाही पण मला...', राम गोपाल वर्मा यांनी या लोकप्रिय अभिनेत्याला Kiss करण्याची व्यक्त केली इच्छा

राम गोपाल वर्मा हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 

Updated: Sep 25, 2022, 04:39 PM IST
'मी Gay नाही पण मला...', राम गोपाल वर्मा यांनी या लोकप्रिय अभिनेत्याला Kiss करण्याची व्यक्त केली इच्छा title=

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) चित्रपटांसोबतच आपल्या वादग्रस्त विधानांसाठी विशेष ओळखले जातात. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत एक खुलासा केला आहे. ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राम गोपाल वर्मा यांना एका अभिनेत्यांला किस करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

आणखी वाचा : धक्कादायक! सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये मोठा वाद, सोशल मीडियावरील पोस्टमुळे एकच खळबळ

राम गोपाल वर्मा यांनी नुकतीच 'टाइम्स ऑफ इंडिया'ला मुलाखत दिली होती. यावेळी राम गोपल वर्मा यांनी ब्रूस लीचा मोठा चाहते असल्याचं सांगितलं. लहान असतानाच त्यांनी ब्रूस ली यांचा ‘एंटर द ड्रॅगन’ हा चित्रपट पाहिला होता तेव्हा पासून ते ब्रूस लीचे फॅन झाले. 'ब्रूस ली जिवंत असते तर त्यांना काय प्रश्न विचारला असता?'  असा सवाल मुलाखती दरम्यान राम गोपाल वर्मा यांना विचारण्यात आला. यावर राम गोपाल वर्मा म्हणाले, 'मी Gay नाही, मात्र ब्रूस ली एकमेव अशी व्यक्ती आहे जिला किस करण्याची माझी इच्छा होती.' 

आणखी वाचा : 'तू खूप मस्त Kiss...', Vidya Balan नं दिली Pooja Bhatt ला शाबासकी

पुढे राम गोपाल म्हणाले, 'ब्रूस लीमध्ये काही तरी वेगळं होतं. त्यांची स्पीड किंवा त्यांची ताकद नव्हे तर त्याचं व्यक्तिमत्व, स्क्रिनवरील वावर आणि त्यांची नजर यातच सर्वकाही होतं. ब्रूस ली यांना त्यांच्या ताकदीची कल्पना होती. त्यांच्या प्रत्येक पंचवर प्रतिक्रिया देण्यासाठी ते चाहत्यांना वेळ देत.' या मुलाखतीत राम गोपाल वर्मा यांनी बिग बी अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्याची संधी न मिळाल्याबाबत खंत व्यक्त केली.

आणखी वाचा : आलियाला हवीत २ मुलं? बाळंतपणाआधीच मुलांचं भाकीत..रणबीरही म्हणतो ट्विन्स..नक्की मामला काय पाहा

दरम्यान, राम गोपाल वर्मा यांचा ‘लड़की: एंटर द गर्ल ड्रॅगन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री पूजा भालेकर मुख्य भूमिकेत दिसली. याशिवाय अभिनेता अभिमन्यू सिंग आणि राजपाल यादव हे देखील प्रमुख भूमिकेत दिसले. हा चित्रपट 15 जुलैला प्रदर्शित झाला.