रतलाम : आपल्या आजूबाजूला धक्कादायक प्रकार घडत असतात. कोणी मालमत्तेसाठी कोणाची हत्या करतो. तर कोणी काही व्यक्तीक कारणामुळे कोणाची हत्या करतं. परंतु मध्य प्रदेशातील रतलाम येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका युवकाचा त्याच्या बायकोनेच हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या बायकोने आपल्या नवऱ्याची हत्याकरुन त्याचा मृतदेह दगडांनी बांधून पोत्यात ठेवला आणि त्याला विहीरित फेकून दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हत्येची तपासणी करत असताना पोलिसांच्या समोर एक मोठी गोष्टं समोर आली आहे. या मृत व्यक्तीच्या बायकोने आपल्या दोन प्रियकरांच्या मदतीने आपल्या पतीच्या हत्येचा करण्याचा कट रचला असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.


28 जून रोजी मृतदेह सापडला


28 जून रोजी जिल्ह्यातील कांकरवा गावात एका शेतकर्‍याच्या शेतातील विहीरित एका पोत्यात मृतदेह आढळला. या शेतकऱ्यांने गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला. त्यावेळेस त्यांनी पाहिले की, या मृतदेहाला बांधून त्याच्या पोत्यात दगड ठेवला. जेणेकरून त्याचे मृत शरीर पाण्यावर येणार नाही.


यामुळे पोलिसांना संशय आला


पोलिसांनी तपास केला असता या मृताची ओळख पटली आणि तो रामलाल असल्याचे समजले. यासंबंधी पोलिसांनी खोलात तपास केला असता, पोलिसांच्या असे लक्षात आले की, त्या मृताच्या पत्नीने म्हणजेच रेखाने रामलाल हरवला असल्याची किंवा घरी आला नसल्याची कोणती ही तक्रार पोलिसांत नोंदवली नव्हती. ज्यामुळे पोलिसांना रेखावर संशंय आला. रेखाबाबत पोलिसांनी गावकऱ्यांकडे विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की, मृताच्या पत्नीचे दोन तरुणांशी प्रेम संबंध आहेत.


रेखाशी प्रेम संबंध असलेल्या दोन तरुणांपैकी शंकरलाल हा कांकरवा गावचाच रहिवासी आहेत. तर दुसरा प्रेमी हा मृताचा नातेवाईक आहे. रेखाने त्या दोन तरुणांसह पतीच्या हत्येचा कट रचला होता.


आरोपी शंकरलालने रामलालला शेतावर बोलावून प्रथम त्याच्यासोबत मद्यपान केले. त्यानंतर तो नशेत असताना या तिघांनी मिळून रामलालचा गळा आवळून त्याची हत्या केली आणि मृतदेहाला पोत्यात बंद केले करुन त्याला दगड बांधून विहीरित फेकून दिले.


जावरा SDOP राजेंद्र विडवल यांनी सांगितले की, "आरोपी मृताची पत्नी रेखा आणि इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि त्याची सखोल चौकशी करुन पुढील कारवाई करण्यात येईल."