कोलकाता : एका महिलेने आपल्या 6 महिन्यांच्या बाळासह नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. हावडा ब्रिजवरून या महिलेने आपल्या बाळासह उडी मारला. यानंतर नेव्हीच्या पथकाने आई आणि बाळाचा शोध सुरु केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेने हावडा ब्रिजवरुन उडी मारल्यानंतर बाळ एका झाडावर अडकलं. नेव्हीच्या पथकाने आई आणि मुलाला शोधून बाहेर काढलं. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर, त्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर स्थितीत, आईला देखील रुग्णालयात दाखल केले गेले.


महिलेचा पती टॅक्सी चालक आहे. तो मुळचा बिहारचा असून गेल्या 6 महिन्यांपासून आनंदपूरमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होता. स्थानिक लोकांनी सांगितले की काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यामुळे पत्नीने ही टोकाचा निर्णय घेतला का याबाबत पोलीस आता तपास करत आहेत.