एकाच तरुणावर दोन बहिणींचा जीव जडला; रागाच्या भरात मोठीने धाकटीच्या डोक्यात...
Love Triangle News Today: छत्तीसगडमध्ये एक भयंकर प्रकार समोर आला आहे. प्रेमाच्या प्रकरणातून एका बहिणीने दुसरीचा जीव घेतला आहे.
Love Triangle News: प्रेम हे आंधळे असते असं म्हणतात. प्रेमाच्या वेडापायी अनेक जण टोक गाठतात. अशावेळी रक्ताच्या नात्यांचाही विसर पडतो. अशीच एक घटना छत्तीसगडमध्ये आहे. प्रेमासाठी तरुणीने तिच्या सख्या बहिणीचा जीव घेतला आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तर, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मोठ्या बहिणीने धाकट्या बहिणीवर कुऱ्हाडीने वार करत तिची निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी 24 तासांच्या आत या हत्येचा तपास करत आरोपी बहिणीला जेरबंद केले आहे. हत्येचा खुलासा होताच कुटुंबीयांनी रडून-रड़ून बेहाल झाले आहेत. एकाच तरुणावर दोघी बहिणींचे प्रेम जडले त्या रागातूनच मोठ्या बहिणीने धाकट्या बहिणीवर कुऱ्हाडीने वार केल्याचे तपासात समोर आले आहे.
छत्तीसगड जिल्ह्यातील खैरागढ-छुईखदान-गंडई जिल्ह्यातील कुशयारी गावातील आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना म्हटलं आहे की, लव्ह ट्रॅंगलप्रकरणातून हा गुन्हा घडला आहे. तपासादरम्यान समोर आले की, दोन्ही बहिणींचे गावातच राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम जडले होते. त्यामुळं दोघींमध्ये वारंवार वाद होत होते. त्यातून मोठ्या बहिणीने धाकटीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत तिची हत्या केली.
घटनेनंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. त्यादरम्यान पोलिसांनी मोठ्या बहिणीचा जबाब संशयास्पद वाटले. त्यामुळं त्यांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने पोलिसांना खरं काय ते सांगून टाकले.
पोलिस अधीक्षक अंकिता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींवर कारवाई करत तुरुंगात पाठवले आले आहे. या प्रकरणी पोलिस अधित तपास करत आहेत.