मुंबई : भारतात Covid-19 च्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असं असलं तरी अनेक नागरिक या महामारीला गांभीर्याने घेत नाहीत हे चित्र वारंवार दिसत आहे. कोरोनाच्या संक्रमणाला थांबवण्यासाठी भारत लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन केलं जातं. मात्र काही लोकं हे नियम धाब्यावर बसवताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच बुधवारी एक हैराण करणारा व्हिडिओ समोर आला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधील हा व्हिडिओ असून प्रचंड व्हायरल होत आहे. टॅक्सीतून जाणाऱ्या महिलेला लॉकडाऊन काळात का फिरत आहेस? असा जाब विचारल्यामुळे महिला पोलिसांशीच भांडताना दिसली. 



महिला कोलकाताच्या साल्ट लेक एरियामध्ये फिरताना दिसली. लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांनी टॅक्सी थांबवून महिलेला कुठे जात असल्याची विचारणा केली. यावर महिला भडकली आणि तिने पोलिसांच्या वर्दीला जीभ लावून चाटण्याचा प्रयत्न केला. महिलेला नेमकं काय करायचं होतं हे मात्र कळलं नाही. 


जिथे डॉक्टर कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टिंगचा वापर करायला सांगत असताना असा व्हिडिओ समोर येणं धक्कादायक आहे. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. महिला पोलिसांना सांगते की,'ती घरी एकटची राहते आणि मेडिकलमध्ये औषध आणण्यास गेली होती.'