Shocking News: हल्ली अनेकजण ऑनलाईन जेवण (Online Food) ऑर्डर करतात. ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारे अनेक अॅपही उपलब्ध आहेत. पण अशाच एका अॅपवरुन ऑनलाईन बर्गर मागवणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेने एका प्रसिद्ध अॅपवरुन अंडा बर्गर (egg burger) ऑर्डर केली. काही वेळातच ऑर्डर घरी आली आणि त्या महिलेने बर्गर खाण्यास सुरुवात केली. पण घास खाताच बर्गरमध्ये जे दिसलं ते पाहून या महिलेला धक्काच बसला. ज्यामुळे महिलेला उलट्या झाल्या. या बर्गरचा एक फोटो तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


बर्गरमधल्या अंड्यातील पिवळं बलक राखाडी झालं होतं आणि त्याला बुरशी लागली होती, असा आरोप या महिलेने केला आहे. ही महिला पेशाने शिक्षिका आहे, या प्रकारामुळे मोठा पश्चाताप झाल्याचा दावा या महिलेने केला आहे.


ऑनलाईन कंपनीचं स्पष्टीकरण
महिलेने आरोप केल्यानंतर ज्या ब्रांडचा हा बर्गर होता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार केमिकल रिअॅक्शनमध्ये अंड्याचा रंग बदलला असावा. पण या महिलेने हा दावा फेटाळून लावला आहे. बर्गरची चवही विचित्र होती असंही या महिलेने म्हटलं आहे. महिलेने आरोप केल्यानंतर कंपनीने बर्गर बदलून देण्याची ऑफर दिली, पण त्या महिलेने नकार दिला. आता पुन्हा बर्गर खाण्याची कधीच इच्छा होणार नाही असंही या महिलेने म्हटलं आहे.