Women Smuggled Gold in Private Part  : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या प्राइवेट पार्ट आणि इनरवेअरमधून तब्बल 2 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. सोन्याच्या तस्करीसाठी महिलेने वापरलेली आयडिआ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. लॅमिस अब्देलराजेग असं महिलेचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय आहे प्रकरण? 
विमानतळावर प्रवाशांची नियमित चेकिंग सुरू होतं. चेकिंगदरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना महिलेवर संशय आला. त्यामुळे तिची खासगी चेकिंग करण्यात आली. चेकिंग केल्यावर जे समोर आलं ते पाहून सुरक्षा अधिकारीही हैराण झाले. महिलेनं तिच्या प्रायव्हेट पार्ट आणि इनरवेअरमध्ये 1,930 ग्रॅम सोनं लपविल्याचं समोर आलं. ही महिला सुदानची नागरिक असल्याचं माहिती समजत आहे. 


शनिवारी संध्याकाळी 7.18 वाजता ती कोलकाता विमानतळावर उतरली होती. त्यानंतर विमानतळावरील इमिग्रेशन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तिचं पासपोर्ट तपासलं. कोलकात्यामध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळाली, मात्र जेव्हा महिलेने ग्रीन चॅनल ओलांडला तेव्हा एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांना तिच्यावर संशय आला त्यानंतर चेकिंगदरम्यान हा सर्व प्रकार समोर आला.


या सोन्याची किंमत 96 लाख 12 हजार 446 रुपये असल्याचं बोललं जात आहे. आता या महिलेच्या शरीरात आणखी सोने दडले असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. महिलेला अटक करण्यात आली असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.