अलीगढ : पत्नीनं पतीवर उकळतं पाणी फेकल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातल्या अलीगढमध्ये घडलीये. या घटनेमागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरा वारंवार सांगूनही दाढी करत नाही या कारणामुळे चिडलेल्या बायकोने नवऱ्याच्या अंगावर उकळतं पाणी फेकलं. या घटनेत पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


पीडित व्यक्ती सलमानचा सहा महिन्यापूर्वी नगमाशी विवाह झाला होता. विवाहानंतर सलमानच्या वाढलेल्या दाढीवरुन वारंवार त्यांच्यात खटके उडत. या दाढीवरुन नगमाने सलमानला मारण्याचीही धमकी दिली होती. 


गुरुवारी त्यांच्यात पुन्हा या प्रकरणावरुन वाद झाला. यामुळे चिडलेल्या नगमाने उकळते पाणी सलमानच्या अंगावर फेकले. यात तो गंभीर जखमी झालाय. दरम्यान, पत्नीविरोधात क्वार्सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये.