Salary Hike : दरवर्षी मार्च महिना उजाडल्यानंतर नोकरदार वर्गाला उत्सुकता लागून राहते ती म्हणजे पगारवाढीची (Salary Hike). किमान पगारवाढ मिळाल्यानंतर समाधानी असणारा एक वर्ग आपल्याला इथं पाहायला मिळतो, तर पगारवाढ कितीही असो सदैव असंतुष्ट असणारा एक वर्गही आपल्याला पाहता येतो. या साऱ्यामध्ये कामाचे तास, मिळणारी सुट्टी, वगैरे वगैरे निकषांच्या आधारे मग आपल्याला मिळणारी रक्कम किती कमी याची गणितंही मांडली जातात. पण, कधी विचार केलाय का,  आपल्या घराला घरपण देणारी, पत्नी, आई, बहीण किती कमावते? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकरी (Job News) न करता कुटुंबालाच प्राधान्य देणाऱ्या महिला वर्गाकडून अनेकदा घरगुती कामांसाठी, कुटुंबातील मंडळींसाठी आपल्या आवडीनिवडी आणि करिअरचा त्याग करावा लागतो. काही महिला तर, नोकरी आणि घर अशी तारेवरची कसरतही करतात. नोकरदार महिलांना एक दिलासा असतो तो म्हणजे महिन्याला त्यांच्या खात्यात येणारा पगार (women jobs). 


नोकरी न करणाऱ्या महिलांचं काय? 


नोकरी न करणाऱ्या महिलांचं काय? कधी विचार केलाय? IIM Ahemadabad येथील एका महिला प्राध्यापकानं याचविषयीचा अहवाल समोर आणला आणि आकडेवारी पाहून अनेकांचेच डोळे विस्फारले. कोणतंही मानधन किंवा तत्सम मोबदला न घेता 15 ते 60 या वयोगटातील महिला तब्बल 7.2 तास काम करतात ही मोठी तफावत दाखवणारी आकडेवारी त्यांच्या निरीक्षणातूनसमोर आली. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Government jobs : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; लाखावर पोहोचला पगार 


नम्रता चिंदरकर असं या प्राध्यापिकेचं नाव असून, घरात काम करत असताना भारतीय महिला किती वेळ नकळत खर्ची घालतात याची माहिती त्यांनी सर्वांसमोर आणली. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिला नोकरी आणि घर अशी जबाबारी सांभाळतात त्या पुरुषांच्या तुलनेत तब्बल 72 टक्के जास्त काम करतात. तर, पुरुषांच्या तुलनेत या महिला रोजगारावरही जास्तीची 150 मिनिटं खर्ची घालतात. 


महिलांना निवांत वेळ नाहीच? 


आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांकडे निवांत वेळ अतिशय कमी असतो. तर, घरातील कामांमध्ये पुरुषांचं योगदान सरासरी 3 तासांहूनही कमी आहे. ही आकडेवारी नेमकं काय सांगू इच्छिते यावर पुन्हापुन्हा उजळणी होण्याची गरज खरंतर भासू नये. पण, वस्तुस्थिती मात्र आजही वेगळी आहे. 21 व्या शतकामध्येही महिलांनी करायची कामं, घरातील कामांमध्ये त्यांचं योगदान आणि महिलांच्या जबाबदाऱ्या याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अद्यापही बदललेला नाही हेच दुर्दैव.