भोपाळ : महिला शिक्षिकेबाबत जे घडलं ते अत्यंत हृदयद्रावक होतं. शिक्षिकेनं आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून आयुष्य संपवलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मी माझ्या मर्जीने आयुष्य संपवत आहे. आई-बाबा-दादा मला माफ करा माझा मंगळ माझा जीव घेऊ  गेला म्हणत शिक्षिकेनं आयुष्य संपवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत शिक्षिकेच्या कुटुंबियांनी तिच्या सासरच्यांवर आरोप केले आहेत. 


नेमकं काय प्रकरण?
महिला शिक्षिका इंदू साहू यांचा विवाह 3 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांच्या लग्नात मोठा हुंडाही कुटुंबियांनी दिला होता. त्यांचं लग्न भोपाळ इथे करुन देण्यात आलं होतं. त्यांच्या पतीचं नाव सुभाष असल्याची माहिती मिळाली आहे. इंदू या सरकारी शाळेत गेस्ट फॅकल्टी म्हणून शिकवण्यासाठी जात होत्या.


मृत शिक्षिकेच्या कुटुंबायांचा सासरच्या मंडळींवर आरोप
कुटुंबियांनी या प्रकरणी सासरच्या मंडळींवर आरोप केला आहे. सासरची मंडळी छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पती वारंवार संशय घेत असल्याचंही कुटुंबियांनी सांगितलं. सुभाषचे इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला आहे. तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हटलं आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार ती हातावर सुसाईड नोट कशी लिहिणार त्यामुळे ही हत्याच आहे. पोलिसांनी कसून चौकशी करावी अशी मागणी केली आहे. 


या संपूर्ण प्रकरणानंतर मृत शिक्षिकेच्या पती फरार आहे. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. प्रथमदर्शी ही आत्महत्या असली तरी हत्या असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केल्याने पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील भोपाळ परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे.