ग्वालियर : केंद्र सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी लावण्याबाबत घोषणा केल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये याला विरोध दर्शवण्यात आलाय. ग्वालियरमध्ये महिलांनी सॅनिटरी नॅपकिनला टॅक्स फ्री करण्यासाठी नवे अभियान सुरु केलेय. एक हजार नॅपकिन्स आणि पोस्टकार्डवर स्वाक्षरी करुन पंतप्रधान मोदींना पाठवले जाणार आहेत.


नॅपकिन्सला महागाईचा दणका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्वालियरमध्ये राहणाऱ्या प्रिती देवेंद्र जोशी यांनी मीडियाशी याबाबत बोलताना मोदींच्या स्वच्छता अभियानावर जोरदार टीका केली. त्यांच्या मते एकीकडे स्वच्छता अभियान सुरु आहे तर दुसरीकडे महिलांना मासिक पाळीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनचे दर वाढवले जातायत. सॅनिटरी नॅपकिन आधीपासून महाग होते त्यावर टॅक्स लावल्याने आता अधिकच महाग होतील.


प्रिती यांच्या मते १५ ते ४० वयोगटातील प्रत्येक महिलेला महिन्यातील कमीत कमी ४ ते ५ दिवसांसाठी सॅनिटरी नॅपकिन्सची गरज पडते. आधीच महागाईमुळे अनेक महिला सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी करु शकत नाहीयेत. त्यात त्यावर जीएसटी लावल्यास त्याचा खिशावर अधिकच ताण होईल. त्यामुळे वापरण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते.



 


नॅपकिन्सवर नाव आणि मेसेज


ग्वालियरमधील महिलांद्वारे सुरु करण्यात आलेल्या या अभियानात मुली आणि महिला नॅपकिनवर त्यांचे नाव आणि मेसेज लिहितायत. हे अभियान ५ मार्चपर्यंत सुरु ठेवण्याची योजना आहे. हे मेसेज मोदींना पाठवून सॅनिटरी नॅपकिनवरील १२ टक्के जीएसटी रद्द करण्यासाठी या महिला प्रयत्न करणार आहेत.