नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. हिच संख्या लक्षात घेत अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याची सुविधा दिली. सांगायचं झालं तर मार्च महिन्यापासून अनेक कर्मचारी ऑफिसचे काम  घरून करत आहेत. त्यामुळे जीवनावश्यक गोष्टी वगळता होणाऱ्या अनावश्यक वस्तूंवरील खर्चाचे प्रमाण कमी  झाल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. शिवाय कोरोना काळात सरकारने सर्व अनावश्यक वस्तूंच्या विक्रीवर बंदी घातली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वर्क फ्रॉम होम'मुळे लोकांचा प्रवासाचा खर्च, कपडे, खाद्य पदार्थ इत्यादी गोष्टींवर होणारा खर्च कमी झाला. त्यामुळे महिन्याच्या उत्पन्नातून प्रत्येकाने ३ ते ५ हजार रूपयांची बचत केली आहे. त्यामुळे कोरोना काळात वर्क फ्रॉम होम हा पर्याय कर्मचाऱ्यांसाठी अधिक फायद्याचा ठरला आहे. 


ऑनलाईन सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७४ टक्के कर्मचारी 'वर्क फ्रॉम होम' करण्यासाठी तयार आहेत. तर ८० टक्के कर्मचाऱ्यांचे मते त्यांचं काम घरून करण्यासारखं नाही. तर ६० टक्के कर्मचाऱ्यांनी प्रवासात जाणारा वेळ वाचल्याचं कारण दिलं.


हे सर्वेक्षण  होमग्रोन फ्लेक्स वर्कप्लेस प्रोव्हायडर-ऑफिसने केलं होतं. जून आणि जुलै महिन्यात झालेल्या या  सर्वेक्षणात विभिन्न मेट्रो शहरातील १ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश होता.