World Population Report : जगातील सर्वाधिक लोकसंख्या भारतात, चीनला टाकलं मागे... पाहा किती फरक
India Vs China Population : जगात सर्वाधिक लोकसंख्येच्या यादीत आतापर्यंत चीन अव्वल स्थानावर होता. पण भारताने आता हा आकडा पार केला आहे. आता सर्वाधिक लोकसंख्येच्या यादीत भारत नंबर वनचा देश बनला आहे.
World Most Population Country: जगातील सर्वाधिक लोकसंख्या (World Most Population) असलेल्या देशांच्या यादीत भारताने (India) चीनला (China) मागे टाकलं असून भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. यूएनएफपीएने (UNFPA) जागतिक लोकसंख्या अहवाल (World Population Report) जाहीर केला आहे. यात भारताची लोकसंख्या 1428.6 मिलिअन इतकी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या 1425.7 मिलिअन आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या चीनपेक्षा 2.9 मिलिअनने अधिक आहे. गेल्या काही वर्षात चीनची लोकसंख्या झपाट्याने कमी होत असल्याचं या अहवलात सांगण्यात आलं आहे.
भारतात सर्वाधिक लोकसंख्या
UNFPA ने 2023 चा जागतिक लोकसंख्या अहवाल जारी केला आहे. '8 बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स एंड चॉइस' या नावाने हा अहवाल आहे. या अहवालानुसार भारताचा एकूण प्रजनन दर 2 टक्के इतका आहे. जगातील एकूण लोकसंख्येने 8 अरबचा टप्पा गाठला आहे. UNFPA च्या अहवालावर भारतातील काही प्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिली आहे. भारताची 1.4 अरब लोकसंख्या ही आम्ही 1.4 संधीच्या रुपात पाहात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
2023 मध्ये भारताची लोकसंख्या 1,428,627,663 इतकी आहे, जी 2022 पेक्षा 0.81% अधिक आहे.
2022 मध्ये भारताची लोकसंख्या 1,417,173,173 इतकी होती, जी 2021 पेक्षा 0.68% अधिक आहे.
2021 मध्ये भारताची लोकसंख्या 1,407,563,842 इतकी होती, जी 2020 पेक्षा 0.8% अधिक आहे.
2020 मध्ये भारताची लोकसंख्या 1,396,387,127 इतकी होती, जी 2019 पेक्षा 0.96% अधिक आहे.
भारतात तरुणांचं प्रमाण जास्त
अहवालानुसार भारतातील लोकसंख्येत तरुणांचं प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील 25 टक्के लोकसंख्या ही 0 ते 14 वयोगटातील आहे. तर 18 टक्के लोकसंख्या ही 10 ते 19 वयोगटातील आहे. 10 ते 24 वयोगटातील आकडेवारी ही 26 टक्के आहे. म्हणजे देशात तरुण वर्गाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे अगदी या उलट चीनमध्ये परिस्थिती आहे. चीनममध्ये एक मोठा वर्ग वृद्ध आहे.
चीनची लोकसंख्या घटली
UNFPA चे भारतातले प्रतिनिधी एंड्रिया वोजनर यांनी केलेल्या दाव्यानुसार भारतातील तरुण वर्गातील लोकसंख्या ही भारतासाठी सकारात्मक आहे. कारण भारताच्या अर्थव्यवस्था वाढीत तरुणाचा वर्गाचा मोठा हातभार आहे. ज्यामुळे आर्थिक विकासाचे नवे पर्याय वाढू शकता. या उलट चीनमध्ये तरुणांच्या तुलनेत वृद्धांची संख्या जास्त आहे आणि याचा त्यांचा आर्थिकवाढीवरही परिणाम दिसू लागला आहे.