मुंबई : महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला आता चाप लावला आहे. गेल्या एका वर्षांमध्ये काही वस्तूंच्या आणि अनेक खाद्यपदार्थाच्या किंमतीही वेगाने वाढल्या आहेत. फळे, भाज्या आणि तेलाच्या किंमतींनी सर्वसामान्यं लोकांचे महिन्याचे बजेट खराब केले आहे. त्यात आज आम्ही तुम्हाला अशा भाजी विषयी सांगणार आहोत, ज्याचे भाव ऐकून तुमच्या चेहऱ्यावरील भाव बदलतील आणि तुम्हाला याचा धक्का बसेल. कारण तुम्ही या भाजीच्या पैशांमध्ये सोन्याचे दागिने खरेदी करू शकता. यावरुनच अंदाज लावा की, या भाजीची किंमत किती असू शकेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही ज्या भाजीबद्दल तुम्हाला सांगत आहोत, त्या भाजीचे नाव 'हॉप शूट्स' आहे. हॉप शूट ही साधारण भाजी नाही, जी तुम्हाला भाजी मार्केटमध्ये आणि इतर भाज्यांसोबत बाजारात आढळेल. ही भाजी केवळ तुम्हाला ऑर्डरवर उपलब्ध केली जाऊ शकते.


बाजारात एक किलो हॉप शूटची किंमत 80 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. होय,  एक किलो हॉप शूटच्या किंमतीत तुम्ही 15 ते 20 ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी करू शकता. एवढेच नाही, तर तुम्ही या एक किलो हॉप शूटच्या किंमतीमध्ये एक चमचमणारी नवीन मोटरसायकल देखील घरी आणू शकता.


बिअर बनवाण्यासाठी वापर


अहवालानुसार, त्याची सध्याची किंमत बर्‍याच वर्षांपासून समान आहे. ही जगातील सर्वात महाग भाजी आहे. या भाजीची किंमत त्यांच्या गुणवत्तेनुसार बदलते. तसेच ही भाजी बिअर तयार करण्यासाठी देखील वापरली जाते.


हॉप शूट्स ही एक अत्यंत दुर्मिळ भाजी आहे, या भाजीचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात. हॉप शूटच्या फुलांना हॉप कोन असे म्हणतात आणि ही फुले बीअर तयार करण्यासाठी वापरली जातात. दुसरीकडे, या भाजीपालाचे कोंब वेगवेगळ्या प्रकारे खाले जातात.