31 March 2024 Deadline: 31 मार्चआधी उरकून घ्या `ही` महत्त्वाची कामं; पैसे वाचवण्याची संधी गमावू नका!
31 March 2024 Deadline: बँक किंवा तत्सम महत्त्वाची कामं लांबणीवर पडली असतील तर, आताच उरकून घ्या. अन्यथा 31 मार्चनंतर तुमचच नुकसान.
31 March 2024 Deadline: नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होण्याआधी देशातील सर्व आर्थिक संस्था अंतिम टप्प्यातील हिशोबास लागल्या आहेत. आरबीआयच्या निर्देशांनुसार देशातील सर्व बँका आर्थिक वर्षाची अखेर असल्यामुळं रविवारीसुद्धा सुरु राहणार आहेत. 1 एप्रिलपासून देशात नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. थोडक्यात 2023-24 हे आर्थिक वर्ष अधिकृतरित्या पूर्ण होत आहे. याच दिवशी काही महत्त्वाच्या कामांच्या पूर्ततेची अंतिम तारीखही असल्यामुळं ही सर्व महत्त्वाची कामं वेळीच पूर्ण करम्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
कोणती कामं 31 मार्च आधी पूर्ण करणं अपेक्षित?
31 मार्चआधी फास्टॅग केवायसी अपडेट न केल्यास 1 एप्रिल पासून तुमचं खातं बंद होऊ शकतं. ज्यामुळं इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड किंवा नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनच्या वेबसाईटवरून तुम्ही केवायसी अपडेट करू शकता.
जीएसटी कंपोझिशन स्कीम
1.5 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी जीएसटी कंपोझिशन स्कीममध्ये अर्जनोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च. व्यावसायिकांनी या प्रक्रियेमध्ये सीएमपी 02 अर्ज भरणं अपेक्षित आहे.
किमान गुंतवणूक अट
सुकन्या समृद्धी आणि सार्वजनिक भविष्य निधी या योजनांअंतर्गत तुम्हीही गुंतवणूक केली असल्यास 31 मार्चपर्यंत तुम्ही किमान गुंतवणूक अटीची पूर्तता करणं अपेक्षित असेल. यासाठी सुकन्या योजनेत 250 आणि पीपीएफमध्ये किमान 500 रुपयांची गुंतवणूक करणं अपेक्षित आहे.
हेसुद्धा वाचा : Loksabha Election : सुप्रिया सुळेंपुढे होम ग्राऊंड बारामतीत अजित पवारांसह इतरही कैक आव्हानं; विरोधकांची नावं पाहूनच घ्या
करबचत गुंतवणूक
2023-24 या आर्थिक वर्षाअंतर्गत तुम्ही जुन्या आयकर योजनेअंतर्गत आयटीआर दाखल करणार असाल, तर या करसवलतीचा फायदा घएण्यासाठी 31 मार्चआधी गुंतवणूक करणं अपेक्षित असेल. इथं तुम्हाला 1.50 लाखांपर्यंतची करसवलत मिळते.
टीडीएस फायलिंग
जानेवारी 2024 साठी वेगवेगळ्या कलमांआधारे घेण्यात आलेल्या करसवलतींसाठी 31 मार्चमध्ये टीडीएस फायलिंग सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे. यामध्ये 30 मार्चआधी चालान स्टेटमेंट जमा करणं अपेक्षित आहे.