श्रीनगर : अनंतनागमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केलं आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला चढवला असून, यात ६ पोलीस शहीद झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीरमध्ये सलग दुस-या दिवशी दहशतवाद्यांनी पोलिसांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा क्रौर्याचे प्रदर्शन करत शहीद पोलिसांच्या मृतदेहांची विटंबना केली आहे. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीआरपीएफला यश आले असून, यामध्ये लष्कर ए तोयबाचा डिस्ट्रीक्ट कमांडर जुनैद मट्टूलाही ठार केले होते. 


मट्टूसह खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव मुझम्मिल असल्याचे सांगण्यात आले आहे. अनंतनाग जिल्ह्यामधील अरवनी गावामध्ये जुनैद आणि त्याच्या दोन साथीदारांना भारतीय सैन्य दल, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करून कोंडीत पकडले होते.  


आठ तास चाललेल्या या चकमकीमध्ये जुनैद आणि मुझम्मील ठार झाले, तर त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला पकडण्यात आले आहे. जुनैदने मागील वर्षी पोलिसांच्या वाहनावर केलेल्या हल्ल्यामध्ये तीन पोलीस मृत्युमुखी पडले होते. जुनैद गेली दोन वर्षे सक्रीय झाल्याचे सांगण्यात येत असून, त्याच्यावर दहा लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते