ताल्लिन: कुस्तीपटू दीपक पुनिया याने तब्बल १८ वर्षांनी भारताला ज्युनिअर गटातील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा पराक्रम केला आहे. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात दीपकने रशियाच्या एलिक सेबुजुकोवचा पराभव करत इतिहास रचला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

८६ किलो वजनी गटातील हा अंतिम सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता. मात्र, दीपकला अंतिम गुण मिळाल्यामुळे त्याला विजयी घोषित करण्यात आले. 


यापूर्वी रमेश कुमार (६९ किलो)  आणि पलविंदर सिंह चिमा (१३० किलो) यांनी २००१ मध्ये या स्पर्धेचे विजेतपेद पटकावले होते. यानंतर दीपक कुमारने १८ वर्षांना भारताला पुन्हा एकदा हे यश मिळवून दिले आहे. 


दुसरीकडे भारताच्या विक्की चहर यानेही ९२ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. विक्कीने मंगोलियाच्या बाटमागनई इंखतुवशिनचा पराभव केला. 



या विजयाबरोबरच दीपकने कझाकिस्तानमध्ये होणाऱ्या सिनिअर गटातील जागतिक कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघात आपले स्थान पक्के केले आहे.