Brij Bhushan Sharan Singh On Immerse Medals In Ganga: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात दिल्लीमध्ये कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनियासारखे आघाडीचे कुस्तीपटू या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. या आंदोलक कुस्तीपटूंनी गंगा नदीत आपले ऑलिम्पिक मेडल्स विसर्जित (Immerse Medals In Ganga) करण्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी हे कुस्तीपटू हरिद्वारमध्ये दाखल झाले. आपली मेडल्स गंगेत वाहण्यासाठी आलेल्या या कुस्तीपटूंना शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी त्यांना समाजवल्याने हे कुस्तीपटू मेडल विसर्जित न करताच परतले. या कुस्तीपटूंनी आपल्या मागण्यांसंदर्भात विचार करण्यासाठी 5 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. तर कुस्तीपटूंनी मेडल्स विसर्जित करण्याचा इशारा दिल्यानंतर बृजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटूंवर निशाणा साधला आहे.


आम्ही काय करु?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर सरकारकडून यासंदर्भात दखल घेतली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर देशासाठी पटकावलेले मेडल्स गंगा नदीत वाहून देणार असल्याचं म्हटलं. याचसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना बृजभूषण शरण सिंह यांनी, "पुढे काय काय होतंय पाहत राहा. तपास तर पूर्ण होऊ द्या. आता तर आमच्या हातातही काहीच नाही. आता प्रकरण दिल्ली पोलिसांच्या हाती आहे," असं म्हटलं. "कुस्तीपटूंच्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आता तपास सुरु आहे. आता यात आम्ही त्यांची काय मदत करु शकतो. आज गंगेत मेडल्स फेकण्यासाठी गेल्या होत्या (महिला कुस्तीपटू) आता गंगेऐवजी त्यांनी टिकैत यांना त्यांनी मेडल्स दिली तर हा त्यांचा निर्णय आहे. यामध्ये आम्ही काय करु शकतो?" असा प्रश्न विचारला आहे.


हरिद्वारला पोहोचले पण...


बृजभूषण शरण सिंह यांनी राजीनामा देण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी माझा कार्यकाळ पूर्ण झाला आहे असं सांगितलं. जर मी चुकीचा असेल तर मला अटक होईल. त्यामध्ये अडचण काय आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपावरुन डब्ल्यूएफआयने अध्यक्षांना पदावरुन निलंबित करावं आणि त्यांना अटक केली जावी अशी मागणी कुस्तीपटू करत आहेत. ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मल्लिक आणि विनेश फोगट यांनी मंगळवारी गंगा नदीमध्ये आपली पदकं विसर्जित करण्यासाठी पोहोचले होते. मात्र नरेश टिकैत यांनी त्यांची समजूत घातली.


आंदोलन चिरडल्याचा आरोप


मंगळवारी सायंकाळी सहा वाजता हरिद्वारमध्ये आम्ही आमची पदकं विसर्जित करणार आहोत असं या कुस्तीपटूंनी जाहीर केलं होतं. "28 मे रोजी जे काही झालं ते आपण सर्वांनी पाहिलं. आमच्याबरोबर कसा व्यवहार करण्यात आला आम्हाला कशी अटक करण्यात आली हे सर्व तुम्ही पाहिलं. आम्ही शांततेत विरोध करत होतो. मात्र आंदोलनाचं ठिकाण रिकामं करण्यासाठी आमच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल करुन आंदोलन चिरडण्यात आलं," असं या कुस्तीपटूंनी म्हटलं आहे.