मुंबई: बऱ्याचवेळा आपली मस्ती आपल्याच अंगाशी येते. हे माहीत असूनही आपण ते धाडस करतो आणि मग अंगाशी आलं की ती चूक सुधारण्यासाठी सगळा जीव एकवटून प्रयत्न करतो. हाच प्रकार एका कार चालकासोबत घडला आणि मोठ्या संकटात सापडला. आपली पहिली चूक सुधारयला जाणार तर ती फसली आणि घात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार चालकानं जाणीवपूर्वक आपली कार धोक्यात टाकल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. य़ा व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चालक उलट्या बाजूने कार चालवत आहे. तो कारला स्पीडमध्ये चालवत असताना समोरून वेगानं गाडी येते. दोघांची एकमेकांना धडक होणार अशी शक्यता निर्माण झाली असताना चालक कारला धडक बसण्यापासून वाचवतो. 



पहिल्या चुकीतून सुधारण्यासाठी आणि अपघात टळावा म्हणून चालकाने गाडी बाजूला केली खरी पण त्यातही मोठी दुर्घटना घडली. कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी 5 गोलांट्या उड्या मारून रस्त्याच्या कडेला पडली. jatt.life नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.


एका चुकीमुळे मोठा अपघाच घडू शकला असता मात्र दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात निभावल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.चुकीच्या बाजूने गाडी चालवणं सिग्नल तोडणं किंवा नियमापेक्षा जास्त वेगानं गाडी चालवणं अशा काही चुकांमुळे आपल्याच जीवावर काही गोष्टी बेतू शकतात. त्यामुळे अशा चुका करू नका. अशा चुकांमुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.