मुंबई : 'द ग्रेट खली' या (The Great Khali) नावाने ओळखला जाणारा प्रसिद्ध रेसलर दलीप सिंह राणाने (Dalip Singh Rana) नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. दलीप राणाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय कार्यालयात खलीने भाजपात प्रवेश केला. खलीच्या पक्ष प्रवेशावेळेस केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि भाजप खासदार सुनीता दुग्गल हे देखील उपस्थित होते.  ( wwe superstar wrestler dalip singh rana aka the great khali joins bharatiya janata party in delhi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप प्रवेशानंतर पहिली प्रतिक्रिया


"भाजपमध्ये प्रवेश करून मला खूप चांगल वाटतंय. WWE मध्ये मला प्रसिद्धी आणि पैशांची कमतरता नव्हती. मात्र देशप्रेमाने मला खेचून मला आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी केलेलं काम पाहून मी प्रभावित झालो. त्यामुळेच मी भाजपमध्ये आलो", अशी पहिली प्रतिक्रिया खलीने दिली.   


"देशाच्या विकासात आपलंही योगदान का नसावं, या विचार माझ्या मनात आला. देशाला पुढे नेण्याचं भाजपचं धोरण आहे. या विचारांनी मी प्रभावित झालो अन भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष जी जबाबदारी देणार ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल", असंही खली म्हणाला.     


खलीच्या स्टारडमचा भाजपला पंजाबमध्ये फायदा 


डब्ल्यूडबल्यूई चॅम्पियन राहिलेला खली याआधी पंजाब पोलीस सेवेत होता. दरम्यान भाजपला खलीच्या सेलिब्रिटी स्टेटसचा फायदा होऊ शकतो. खली मुळचा हिमाचल प्रदेशचा आहे. मात्र तो सध्या जालंधरमध्ये कॉन्टिनेंटल रेसलिंग एकडेमी (Continental Wrestling Entertainment) चालवतो. या एकडेमीत खली इच्छूकांना कुश्ती शिकवतो.