नवी दिल्ली : Yasin Malik convicted in terror funding case: दहशतवादी आणि फुटीरतावादी नेता यासिन मलिक एनआयए न्यायालयाने दोषी ठरवले आहे. टेरर फंडिंग प्रकरणात यासिनला दोषी ठरवण्यात आले. याप्रकरणी 25 मे रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. या निर्णयानंतर पाकिस्तानचा संताप वाढत आहे. दरम्यान, शेहबाज शरीफ यांच्या सरकारने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याला बोलावून घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच सुटकेची मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी यासिन मलिक याला एनआयए न्यायालयात टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.  यासिन मलिकच्या शिक्षेवर आता 25 मे रोजी निर्णय होणार आहे. तोपर्यंत यासीन मलिक याची आर्थिक स्थिती जाणून घेण्यास न्यायालयाने एनआयएला सांगितले आहे.


यासीन मलिकवर अनेक गंभीर आरोप


यासीन मलिकवर गुन्हेगारी कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, काश्मीरमधील शांतता बिघडवणे यासह अन्य बेकायदेशीर कारवाया केल्याचाही आरोप आहे. यासीन मलिकला 2017 मध्ये काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांशी संबंधित एका प्रकरणात दिल्लीतील NIA न्यायालयाने दोषी ठरवले होते. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यातही तो दोषी आढळला आहे.


25 मे रोजी शिक्षेची घोषणा होणार


एनआयए कोर्टाने या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान असेही म्हटले होते की, स्वातंत्र्य चळवळीच्या नावाखाली जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कारवाया करण्यासाठी मलिकने जगभरातून निधी गोळा करण्यासाठी एक यंत्रणा तयार केली होती. आता याच यासिन मलिकला 25 मे रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.


16 मार्चच्या आदेशात एनआयएचे विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी सांगितले होते की, साक्षीदारांचे वक्तव्य आणि पुराव्यांचे विश्लेषण हे दर्शविते की आरोपीने या प्रकरणातील उर्वरित लोकांशी समान हेतूने संबंध जोडले होते. आरोपी मलिकने पाकिस्तानकडून सूचना घेत असताना दहशतवादी संघटनांशी असलेल्या जवळच्या संबंधांचा वापर करून त्याच्या कारवायांसाठी निधी गोळा केला होता.