सभात्याग करत येडियुरप्पांचा मुख्यमंत्री कुमारस्वामींना इशारा
पहिल्याच दिवशी विधानसभेचं वातावरण तापलं
बंगळुरु : कर्नाटक विधानसभेमध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वास ठराव सादर केला. विश्वास ठरावावर मतदान होणार आहे. याआधी विधानसभेला संबोधित करतांना त्यांनी म्हटलं की, जनमत भाजपच्या बाजूने नव्हतं. भाजपने फ्लोर टेस्टच्या आधी वॉकआउट केलं. येदियुरप्पा यांनी म्हटलं की, जर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली तर सोमवारपासून ते राज्यात विरोध प्रदर्शन करणार आहेत.
याधी कुमारस्वामी यांनी म्हटलं की, 'यंदाचं जनमत हे 2004 च्या प्रमाणे आहे. त्यावर्षी पहिल्य़ांदा ते आमदार झाले होते आणि विधानसभेतील कामकाज पाहत होतो. मी गुलाम नबी आजाद, सिद्धारमैया आणि परमेश्वर यांना धन्यवाद देतो.' येदियुरप्पांनी म्हटलं की राज्यपालांनी नियमांचं पालन केलं. त्यांनी सर्वात मोठ्या पक्षाला सरकार बनवण्याची संधी दिली.