बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्वत: मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असलेले बी एस येडीयुरप्पा यांनी भलेही भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवारांच्या तिकीट वाटपात महत्त्वाची भूमिका बजावली असेल. पण, असे असतानाही भाजपच्या शिर्ष नेतृत्वाने चक्क येडीयुरप्पा यांनाही जोरदार धक्का दिला आहे. भाजपने येडिययुरप्पा यांचा मुलगा बी वाय विजयेंद्र यांनाच तिकीट नाकारले आहे. ते म्हैसूर येथील वरूणा विधानसभा मतदार संघातून निवडणुक लडणार होते. दरम्यान, कॉंग्रेसच्या वतीने मख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पूत्र या मतदारसंघातून निवडणुक लढत आहेत.


येडियुरप्पांचा लगाम खेचला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटक विधानसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीत आता पुरता रंग भरला असून, पक्षांतर्गत वाद विवाद आणि शह-काट'शहा'चे राजकारण दिसत आहे. कर्नाटक भाजपाने बी एस एडियुरप्पा यांचे नाव भलेही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले. पण, त्यांच्या मुलाला उमेदवारी नाकारून येडीयुरप्पांचा वारू जोरदार उधळू नये यासाठी लगाम आपल्याच हाती ठेवला अशी चर्चा आहे. कर्नाटक भाजपाचे अध्यक्ष येडियुरप्पा यांनी सोमवारी घोषणा करून सांगितले की, आपले पूत्र निवडणूक लढवणार नाहीत. दरम्यान, येडियुरप्पांनी ही घोषणा करताच भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी निदर्शने करण्यास सुरूवात केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. 


काय म्हणाले येडियुरप्पा ?


दरम्यान, येडियुरप्पा यांनी म्हटले की, विजयेंद्र आज नवडणूक अर्ज दाखल करणार नाहीत. एक सामान्या पक्ष कार्यकर्ता मैदानात आहे आणि तोच अर्ज दाखल करेन. इतकेच नव्हे तर, त्यांनी असेही सांगितले की, मी आपणास हात जोडून विनंती करतो की, उमेदवारांना बहुमताने विजयी करा. 


जोरदार प्रचार केला पण उमेदवारी मात्र मिळाली नाही


दरम्यान, वरूणा मतदारसंघातून लढण्यासाठी बी वाय विजयेंद्र यांनी जोरदार प्रचार आणि मोर्चेबांधणी केली होती. मात्र, ऐन वेळी पक्षाने उमेदवारी नाकारली. दरम्यान, या मतदारसंघातून कोण रिंगणात उतरणार याबाबत जोरदार उत्सुकता होती. पण, दीर्घ काळ भाजप नेतृत्वाने उत्सुकता कायम ठेवत उमेदवारीच जाहीर केली नाही. अखेर, बी वाय विजयेंद्र रिंगणात नाहीत हे स्पष्ट जाले आणि कार्यतकर्त्यांचा हिरमोड झाला.