मुंबई: YES बँकेच्या संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. YES बँकेचा अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडल्यानंतर त्या अधिकाऱ्याला आता सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे. येस बँकेशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. येस बँकेच्या अधिकार्‍यांचे कारनामे आता त्यांच्यावर पडून आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासात अडकलेल्या एका अधिकाऱ्याला बँकेनं सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँकेने इतर बँकांकडून भांडवल मिळवून येस बँकेला बुडण्यापासून वाचवलं. 


अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीनंतर बँकिंग हेड आशीष अग्रवाल यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे. येस बँक प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात आशीष अग्रवालचे नाव समोर आलं आहे. अग्रवाल यांनी मुख्य क्रेडिट रिस्क अधिकारी म्हणून अनेक कर्ज पास केली होती.


ED च्या म्हणण्यानुसार अग्रवाल यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि नीट पार पाडली नाही. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अग्रवाल यांच्या नावाचा समावेश आहे.


नुकतीच आशीष अग्रवाल यांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्यात आली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर YES बँकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. स्टाफ रिव्ह्यू मिटिंगमध्ये हा सगळा प्रकार फेब्रुवारीत समोर आला होता. मात्र त्यावेळी कारवाई का केली नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 


चार्जशीटमध्ये नाव आल्यानंतर YES बँकेला सक्तीनं कारवाई करावी लागली. ज्यांच्या विरोधात SEBI च्या ऑर्डर्स आहेत तेही लोक अजून सिस्टिमचा भाग कसे आहेत. इतकच नाही तर त्यांच्यावर अजून कारवाई का केली जात नाही. असे अनेक प्रश्न समोर येत आहेत.


SEBI चे नियम मोडणाऱ्या काही अधिकाऱ्यांची नावंही समोर आली आहेत. 
संजय नांबियार,  ग्रुप लीगल काउंसेल, यस बँक
निरंजन बनोड़कर- CFO
शिवानंद शेट्टीगर- कंपनी सेक्रेटरी
आशीष अग्रवाल, हेड, व्होलसेल बँकिंग