चंदिगड : भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीत कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबिता फोगाट यांना रिंगणात उतरविले आहे. कुस्तीच्या आखाड्यातून हे दोघे आता थेट निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. भाजपकडून पहिली उमेदवारी जाहीर झाली आहे. या दोघांसह सात खेळाडूंना भाजपने उमेदवारी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज ७८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत ३८ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दरम्यानस सात आमदारांना घरी बसविले आहे. सात खेळाडूंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. कुस्तीपटू योगेश्वर दत्त (बरौदा), बबिता फोगाट (दादरी), माजी हॉकीपटू संदीप सिंग (पिहुआ), लतिका शर्मा (कालका) आणि ज्ञानचंद्र गुप्ता (पंचकुला) यांना उमेदवारी दिली आहे. 



कर्नालमधून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर निवडणूक लढवणार आहेत. खट्टर यांनी २०१४ मध्ये कर्नालमधून निवडणूक लढवली आणि जिंकली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला, अनिल वीज, कंवरपाल गुर्जर, कृष्ण बेदी आदींसह माजी केंद्रीय मंत्री आणि जाट नेते वीरेंद्र सिंह यांच्या पत्नी उचाना यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत ९ महिला आणि दोन मुस्लिमांना उमेदवारी देण्यात आली आहे.