प्रयागराज : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी कुंभमेळ्यात आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबत संगममध्ये कुंभस्नान उरकलं. त्यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी लखनऊच्या बाहेर कुंभनगरी प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याची बैठक घेतली. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा योगी सरकारची अधिकृत कॅबिनेट बैठक लखनऊच्या बाहेर झाली. मुख्यमंत्र्यांसोबत आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी आणि इतर साधु-संतांनी पवित्र स्नान केलं. कुंभमेळ्यात डुबकी मारण्यासाठी अनेक लोक दाखल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशचं संपूर्ण मंत्रीमंडळ आणि राज्यामंत्र्यांनी संगममध्ये पवित्र स्नान घेतलं. मी हे माझं सौभाग्य मानतो. आजचा दिवस प्रयागराजसाठी ऐतिहासिक दिवस आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 



कुंभस्नानानंतर मुख्यमंत्र्यांनी दिव्य कुंभ, भव्य कुंभ सेल्फी पॉईंटवर मंत्र्यांसोबत फोटोही घेतले. 


यावेळी, एकूण ६०० किलोमीटर लांबीच्या जगातील सर्वाधिक लांबीच्या गंगा एक्स्प्रेसवेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली. या एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून प्रयागराजला पश्चिम उत्तर प्रदेशशी जोडण्यात येणार आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. गंगा एक्स्प्रेस वे असे या मार्गाचे नामकरण करण्यात येणार असून, तो मीरत, अमरोहा, बुलंदशहर, शहाजहांपूर, कन्नोज, उन्नाव, रायबरेली, प्रतापगढ या मार्गाने प्रयागराजपर्यंत येईल.