Yogi Adityanath Speech On  Ram Mandir :  प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha Inauguration) आज अयोध्येतील राम मंदिरात करण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज प्रसन्नता आणि संतोषाचे भावना आहेत. भारताला याच दिवसाची प्रतिक्षा होती. मंदिर तिथंच तयार झालं, जिथं तयार करण्याचा संकल्प केला होता, असं योगी म्हणाले. येत्या काळात भारताची सांस्कृतिक प्रतिमा म्हणून अयोध्या समोर येईल. हे राष्ट्रमंदिर होईल, असंही योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath Speech) म्हणाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?


अयोध्येत कधीही कर्फ्यू लावला जाणार नाही, तर आता फक्त प्रभू रामचंद्राचा जयजयकार होईल. आता या भूमीवर कधी गोळी चालणार नाही, आता रामभक्तांना लाडू वाटले जातील, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. अयोध्येत कोणीही पंचकोसी, 14 कोसी आणि 84 कोसी परिक्रमा रोखण्याची हिंमत करणार नाही, असंही योगी म्हणाले. संत, संन्यासी, पुजारी, राजकीय नेते, सामान्य लोकांनी यासाठी लढा दिला. शेवटी अखेर कोटी-कोटींची आस्था असलेल्या राम मंदिराचं उद्घाटन झालं, असंही त्यांनी म्हटलंय.


जगात एकमेव असा लढाई असेल तिथं देशातील सर्वात मोठ्या समाजाने त्याच्या देवतासाठी एवढी मोठी लढाई दिली. देशातील बहुसंख्य असलेल्या समाजाने आपल्या आराध्य असलेल्या प्रभू राम यांच्या जन्मस्थानी मंदिर बनवण्यासाठी लढा दिला. प्रत्येकाच्या मनात राम-नाम आहे. प्रत्येकाचे डोळ्यांत आनंदाश्रू आहेत. पूर्ण राष्ट्र राममय आहे. असं वाटतंय आपण त्रेतायुगात आलो आहोत, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. 



दरम्यान, अयोध्या नगरीत आता गोळीबार नसेल, संचारबंदी लागणार नाही. अयोध्या आता संस्कृतीत राजधानी रुपात उदयास येत आहे. दिव्य आणि भव्य अयोध्येच्या विकासासाठी अनेक प्रक्लप तयार केले जात आहेत. अयोध्येत स्कॉलरसिटी म्हणून विकसित केली जातीये. संकल्प आणि साधनेच्या सिद्धीसाठी, आपली प्रतिक्षा संपवण्याकरता आणि संकल्पाच्या पूर्णतेसाठी योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.