नवी दिल्ली : भारतीय इतिहासात आणि संस्कृतीत ताजमहलच्या संदर्भातील वाद सुरू असतानाच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज ताजमहालला भेट देणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगी अर्धा तास ताजमहलमध्ये घालवतील. यावेळी शाहजहान आणि मुमताज महल यांची कबरदेखील पाहतील. तसेच योगी ताजच्या बाहेर स्वच्छतादेखील करणार आहेत. भाजपच्या 500 कार्यकर्त्यांसोबत योगी ताजच्या पश्चिम गेटवर स्वच्छता करतील. 


तत्पूर्वी यूपी सरकारनं पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहलचं नाव नुकतच गहाळ केलं होतं. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपच्या काही नेत्यांनी ताजप्रकरणी वादग्रस्त विधानं देखील केली होती. योगी आदित्यनाथ ताजमहालाचा दौरा करणारे उत्तरप्रदेशचे पहिले भाजप मुख्यमंत्री आहेत.