नवी दिल्ली : भाजपचे तडफदार नते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आपल्याला अनेक गोष्टी माहीत झाल्या असतील... परंतु, योगी आदित्यनाथांच्या कुटुंबाबद्दल आपल्याला फारच थोडी माहिती असेल... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोमध्ये दिसणारा जवानाचं नाव आहे शैलेंद्र मोहन... हा जवान म्हणजे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा छोटा भाऊ... शैलेंद्र मोहन भारतीय सेनेत 'सुभेदार' पदावर कार्यरत असून ते सध्या भारत-चीन सीमारेषेवर तैनात आहेत.


देशसेवेसाठी शैलेंद्र सज्ज


मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र मोहन गढवाल स्काऊट युनिटमध्ये माना बॉर्डरवर तैनात आहेत. गढवाल स्काऊट युनिट केवळ स्थानिकांसाठी सीमारेषेवरील संरक्षणासाठी कार्यरत आहे. 


सध्या चीनच्या घुसखोरीच्या पाश्वभूमीवर या सीमारेषेला सध्या महत्व प्राप्त झालंय. शैलेंद्र मोहन यांना आपण भारतीय सेनेसोबत असल्याचा गर्व आहे. आपल्या मातृभूमीसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असल्याचं ते सांगतात.


बंधुभेट होते का?


मोहन आपल्या मोठ्या भावाला - आदित्यनाथ यांचा आदर करतात. परंतु, वेळेअभावी त्यांची वारंवार भेट मात्र अशक्य आहे. 


योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री पदावर आरुढ झाल्यानंतर मोहन यांनी दिल्लीमध्ये त्यांची भेट घेतली होती. दोन्ही भाऊ देशसेवेसाठी आपली कर्तव्य पूर्ण करत असल्याचं ते सांगतात.


योगींचे तीन भाऊ


उल्लेखनीय म्हणजे, योगी आदित्यनाथांना तीन भाऊ आहेत. यापैंकी पहिले आहेत मानवेंद्र मोहन... मानवेंद्र आदित्यनाथांपेक्षा मोठे आहेत. तर शैलेंद्र आणि महेंद्र मोहन हे आदित्यनाथांचे छोटे भाऊ आहेत.