लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका (UP Election) संपताच प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. शनिवारी एसडीएम आरएन वर्मा यांनी टीम फोर्ससह शहरात अतिक्रमणाविरोधात जोरदार मोहीम राबवली. अतिक्रमण लवकर न काढल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसडीएम आरएन वर्मा शनिवारी पोलीस दलासह शहरात पोहोचले, जिथे त्यांनी अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना कोणतेही अतिक्रमण न करण्याचा इशारा दिलाय. उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा ही दिलाय. ते म्हणाले की, 'अतिक्रमणामुळे शहरात येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. अपघाताची शक्यता वाढत आहे.'


24 तासांत अतिक्रमण काढण्याचा इशारा त्यांनी अतिक्रमणधारकांना दिला. तसं न झाल्यास पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण काढण्याचे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर दंडही आकारला जाईल. रस्त्यावर हातगाड्या लावता येणार नाही. ज्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला रिकामी जागा असेल तेथे हातगाड्या बसवाव्यात.


नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबवावी, असे निर्देशही एसडीएमने नगर पंचायतीला दिले आहेत.